Just another WordPress site

देशातील विविध विद्यापीठांनंतर बिहारच्या मुलाचा हार्वर्डमध्येही डंका, शरद सागर यांची विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी निवड

देशातील विविध विद्यापीठांमध्ये बिहारच्या विद्यार्थ्यांनी डंका वाजवल्यानंतर आता बिहारच्या विद्यार्थ्यांनी परदेशातही डंका वाजवायला सुरूवात केली. बिहारमधील एका साध्या कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्याने हार्वर्ड विद्यापीठात कमाल केली. बिहारच्या शरद सागर यांची अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

 

महत्वाच्या बाबी

१. शरद सागर यांची हार्वर्डच्या वि.सं. अध्यक्षपदी निवड
२. शरद यांचा फोर्ब्सने केला प्रभावशील व्‍यक्‍तींत समावेश
३. शरद यांना फॉलो करणार्‍यांची संख्‍या ५ लाखांहून अधिक
४. शरद सागर यांच्यावर स्‍वामी विवेकानंद यांचा प्रभाव

 

हार्वर्ड विद्यापीठाने अधिकृतपणे २१ सप्टेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले. हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठी मतदान १४ सप्टेंबरला सुरू झाले आणि १९ सप्टेंबरला संपले. या निवडणूकीत बिहारच्या शरद विवेक सागर यांनी इतिहास रचला. हार्वर्ड ग्रॅज्युएट स्‍कूल ऑफ एज्‍युकेशन या विद्यार्थी संघटनेच्‍या अध्यक्षपदी त्‍यांची निवड झाली. त्यांना ५० देशांमधील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान केले. या निवडणुकीत ९ उमेदवार रिंगणात होते. त्यांचा पराभव करत विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. ते मे २०२२ पर्यंत म्हणजेच हार्वर्ड येथील दीक्षांत समारंभापर्यंत या पदावर राहतील.
या निवडणुकीबाबत शरद सागर यांनी आपल्‍या फेसबुक पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी निवड होणारा मी पहिला भारतीय ठरलोय. याचा मला आनंद आहे. हार्वर्ड विद्यापीठापासून खूप दूर जन्‍मगाव असणाऱ्या माझ्‍यासारख्‍या विद्यार्थासाठी हे अशक्यच होतं. मात्र ‘हार्वर्ड’च्‍या विद्यार्थ्यांनी माझ्‍यावर विश्‍वास दाखवून जबाबदारी टाकल्याबद्दल मी त्‍यांचा आभारी आहे. अध्यक्ष या नात्याने, मला हार्वर्डमध्ये अशा नेतृत्वाची पायाभरणी करायची आहे, जी विद्यार्थ्यांच्या जीवनात खरा बदल घडवू शकेल, अशी पोस्ट त्यांनी टाकली.
शरद विवेक सागर यांचा जन्‍म भारताचे पहिले राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्रपसाद यांचे जन्मगाव असणार्‍या बिहारमधील सिवान जिल्‍ह्यातील जीरादेई येथे एका सामान्‍य कुटुंबात झाला. वयाच्‍या बारावर्षांपर्यंत त्‍याचे पाटणा येथेच शिक्षण झाले. ४ कोटी रुपयांची शिष्‍यवृत्ती मिळाल्‍यानंतर ते अमेरिकेला अध्‍ययनासाठी गेले. बारावीची परीक्षा देण्‍यापूर्वी त्‍यांनी भारताचे ६ देशांमध्‍ये प्रतिनिधित्‍व केले होते. टफ्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये त्‍याने आंतरराष्‍ट्रीय संबंधांवर पदवीसाठी त्‍यांना स्‍कॉलरशिप मिळाली. यानंतर हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी त्यांना HGSE अनुदान आणि KC महिंद्रा शिष्यवृत्ती मिळाली होती. शरद विवेक सागर हे स्‍वामी विवेकानंद यांना आपला आदर्श मानतात. अमेरिकेत युथ आयकॉन अशी ओळख असलेले शरद सागर हे मितभाषी आणि शांत स्‍वभावाचे आहेत. अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शरद सागर यांचे नाव आघाडीवर आहे. २०१६ मध्‍ये अमेरिकेचे तत्‍कालिन राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी व्‍हाईट हाउसमध्‍ये झालेल्‍या एका विशेष सभेसाठी त्‍यांना निमंत्रण दिले होते. त्‍यांनी अमेरिकेतील विविध चर्चासत्रांमध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व केले आहे. महत्वाचं म्हणजे, २०१६ मध्‍ये नोबोल शांतता पुरस्‍कार सोहळ्यात विशेष पाहुणे म्‍हणूनही त्‍यांना निमंत्रण मिळाले होते.
दहावीनंतर २००८ त्यांनी द डेक्सटेरिटी ग्लोबल ग्रुपची स्‍थापना केली. हा ग्रुप विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी आणि प्रशिक्षणाद्वारे तळागाळात नेतृत्व निर्माण करण्याचे काम करतो. हा ग्रुप भारतातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्‍ध करुन देते. जगभरातील विविध शिक्षण संस्‍थांमध्‍ये ५२ कोटी रुपयांहून अधिक स्‍कॉलरशिप मिळवून दिली.
शरद सागर यांच्याकामामुळं त्यांचा फोर्ब्स मासिकाने ३० वर्षांच्‍या आतील सर्वात प्रभावशील व्‍यक्‍तींच्‍या यादीत समावेश केला. ब्रिटनच्‍या राणीच्या यंग लीडर्स लिस्टमध्ये देखील त्‍यांच्‍या नावाचा समावेश आहे. शरद सागर यांना सोशल मीडियावर फॉलो करणार्‍यांची संख्‍या ५ लाखांहून अधिक आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!