Just another WordPress site

मोंदीची मन की बात आता ओठांवर आली; काँग्रेसचा ‘त्या’ व्हिडीओवरून मोदींना टोला


वेब टीम नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. देशातील या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलीय. यावेळी अधिकाऱ्यांशी कोरोना लढ्यासंदर्भात चर्चा करतांना पंतप्रधान मोदींनी एक गंभीर चूक केली. अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतांना चक्क पंतप्रधानांनी देशामध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्ह केस वाढल्या पाहिजेत असं म्हटलं.

प्रधानमंत्री जी ‘पॉजिटिव केस’ बढाने का प्रयास करने के लिए सिर्फ कह नहीं रहे हैं, बल्कि पश्चिम बंगाल में चुनावी रैलियों में भीड़ गिनकर इन्होंने पहले उदाहरण प्रस्तुत किया है- पॉजिटिव केस बढ़ाने का।

वैसे भी जुबां पर वही आता है, जो दिमाग में चल रहा होता है।#COVID19India pic.twitter.com/EdYromc5pt

— Congress (@INCIndia) May 18, 2021



मोदींकडून ही चुक अनावधावने झाली असली तरी दरम्यान पंतप्रधान मोदी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झालाय. कॉग्रेसच्या टि्वटर अकाऊंटवरूनही हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर टीकेची तोफ डागण्यात आली. जीभेवर तीच गोष्ट येते जी डोक्यात सुरु असते, अशा शब्दात काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!