Just another WordPress site

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने आम्हाला कोणातही फरक पडत नाही, हौसले बुलंद है- संजय राऊत

मुंबई: पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात शिरण्यापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी ‘हौसले बुलंद है’ अशा धाटणीची प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेचं नवं चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल. यापूर्वी देशात ज्या पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली, ते पक्ष पुढे जाऊन मोठे झाले. आम्हीदेखील तसेच मोठे होऊ. आमच्यात असलेलं शिवसेनेचं स्पिरीट (इच्छाशक्ती) अजूनही हाय आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने आम्हाला कोणातही फरक पडत नाही. आम्ही नव्या जोमाने काम करु. आम्ही पक्षाचे नवे चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव लोकांपर्यंत पोहोचवू, अशा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचा अजेंडा प्रसारमाध्यमे आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संजय राऊत हे चोखपणे पार पाडत होते. संजय राऊत भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देण्याचे काम करत होते. या माध्यमातून संजय राऊत हे शिवसेनेच्या केडरला सतत चार्ज करण्याचे काम करत होते. परंतु, संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर शिवसेनेकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणार प्रभावी वक्ता उरला नव्हता. मात्र, आता संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकणार का, हे पाहावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!