Just another WordPress site

कोरोना लसीकरण करून घेण्यासाठीची प्रक्रिया घ्या जाणून

भारत सरकारने सुरु केलेल्या  कोव्हिड-१९ लसीकरणाचा आज देशात चौथा टप्पा सुरू झालाय…  या लसीकरणामध्ये देशामधल्या ४५ वर्षांपुढील  सर्व नागरिकांना कोरोनाची आता लस घेता येईल. आतापर्यंत केवळ कोरोनायोद्धे, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लस देण्यात येत होती. मात्र आता मध्यम वयातील बाधित व्यक्तींचं प्रमाण वाढत असल्याने त्यांचाही कोणत्याही अटी शर्थींशिवाय लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. हे लसीकरण कसं होणार आहे, लस घेण्यासाठी कशी आणि कुठे नोंदणी करावी लागणार… या सामान्यांना पडलेल्या प्रश्नांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…

हायलाईट्स
१. कोविन पोर्टलवर करता येणार नोंदणी
२. खाजगी रूग्णालयात करता येणार लसीकरण
३. सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मोफत  
४. खासगी रुग्णालयात लसीकरणाचा २५० रूपये

लसीकरणासाठी कशी नोंदणी करणार?
तुम्ही जर सरकारने ठरवून दिलेल्या वयोगटामध्ये आहात तर लस घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येणार आहे.  https://www.cowin.gov.in/home या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा फोननंबर रजिस्टर करू करून त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तींना लस घ्यायची आहे, त्यांचा तपशील भरून त्यांचं नाव नोंदवता येईल. 

थेट रुग्णालयात जाऊन लस घेता येईल
एखाद्या व्यक्तीला या पोर्टल किंवा अ‍ॅपवरुन नोंदणी करता आली नाही तर ती व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करु शकते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विमा योजनेशी संलघ्न खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येतेय….  मात्र,  केंद्राच्या नियमावलीनुसार खासगी रुग्णालयात को-विन अॅपमध्ये नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात मात्र वॉक-इन किंवा ऑन-साइट नोंदणी करून लस घेता येऊ शकते. त्यामुळे नोंदणीशिवाय खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी दाखल झालात तर तुम्हाला लस मिळणार नाही. मात्र, तुम्हाला सरकारी रुग्णालयात को-विन अॅपशिवाय थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करून लस घेऊ शकता.

लसीकरणाची वयोमर्यादा
आरोग्य मंत्रालयाने आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेसंदर्भातील कट ऑफ डेट काय असेल याबद्दलची माहिती दिलीय… सरकारने एक जानेवारी २०२१ च्या आधारावर ही तारीख जाहीर असून १ जानेवारी १९७७ ही कट ऑफ डेट म्हणून जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच एक जानेवारी १९७७ आधी जन्म झालेल्या सर्व व्यक्तींना या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस घेता येणार आहे….

काय कागदपत्रं सोबत ठेवावी ?
कोव्हिड-१९ लसीकरण करून घेतांना आपल्याला आपलं ओळखपत्र न्यावं लागणार आहे. ओळखपत्र म्हणून तुम्ही आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स यासारख्या फोटो असणारी सोबत घेऊन जाऊ शकता.

लसीकरणासाठी अपॉइण्टमेंट बुक करा
एका मोबाइल क्रमांकावरुन स्वत:सोबत इतर ३ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते. नोंदणी करण्यासाठी सर्व माहिती भरुन ती सबमीट केल्यानंतर दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस येईल. नोंदणी पूर्ण केल्यानंतर जी माहिती देण्यात आली ती पडताळून पाहण्यासाठी आणि आवश्यक असल्यास बदल करण्यासाठी पर्याय दिला जाईल. त्यानंतर नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक नावाच्या पुढे अ‍ॅक्शन  असा पर्याय दिसेल. त्याखाली कॅलेण्डरचा आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर हव्या त्या तारखेला लस घेण्यासाठी वेळ निवडता येईल.

स्मार्टफोन  नसलेल्यांना मिळेल लस
राज्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात रहाणाऱ्या अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. मग अशा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा इतर आजार असलेल्यांनी काय करावं? राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ऑन-साइट नोंदणी आहे. लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात.

अवघ्या काही रुपयात मिळेल लस
सरकारी रुग्णालयामध्ये लसीकरण  केंद्रांवर कोव्हिड १९ विरोधी लस मोफत दिली जातेय…  खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण २५० रुपयांना केलं जाईल. यात १५० रूपये लशीची किंमत आणि १०० रुपये ऑपरेशन चार्जसाठी घेतले जातील. 

दुसरा डोस कधी घ्यावा?
सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशील्डच्या दोन डोसच्या कालावधीमध्ये बदल केलाय. नव्या नियमांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिल्या डोस नंतर चार ते आठ आठवड्यांदरम्यान कधीही दुसरा डोस घेता येईल. कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस हा चार ते सहा आठवड्यांमध्ये देता येईल असं स्पष्ट करण्यात आलंय.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!