Just another WordPress site

औरंगाबादेत शेतकरी घेतोय १ लाख रूपये किलो असलेल्या ‘या’ भाजीचं उत्पादन


ज भाजीचे भाव जरा देखील वाढले तर तरी आपण ओरडतो. कारण आपल्याकडे असलेल्या भाज्यांचा दर फार फार तर १०० रुपये किलोच्या आसपास असतो. मात्र, जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रति किलो आहेय, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आणि त्याच्याही पेक्षा मोठं नवल या गोष्टीचं वाटेल की, देशातील शेतकऱ्यासमोर दुष्काळ, जीवघेणे कृषी धोरणं असे अनेक प्रश्न आ वासून उभे असतांना एक शेतकरी या भाजीचं उत्पादन घेतोय.हायलाईट्स– 

१. हॉप-शूट्स भाजी १ लाख रुपये किलो
२. बिहार घेतल्या जातं हॉप-शूट्सचं उत्पादन
३. ११ व्या शतकात पहिल्यांदा घेतलं उत्पादन
४. हॉप-शूट्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी

या भाजीचं नाव आहे हॉप-शूट्स. कदाचित या भाजीचं नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल. या एक किलो हॉप शूट्स भाजीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एक हजार युरो म्हणजेच जवळपास एक लाख रुपये इतकी आहे.  ही भाजी आपल्याला भाजी विक्रेत्यांकडे पाहायला मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला बिहारला जावं लागेल. बिहारमधील औरंगाबाद भागातील  ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या जगातील सर्वात महागड्या अर्थात,  १ लाख रुपये किलो विकणाऱ्या भाजीचं उत्पादन घेतात. केवळ उत्पादनचं घेतल्या जातं नाही तर, या भाजीला चांगली मागणी देखील आहे.  या भाजीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसलाय. जवळपासच्या लोकांना हा शेतकरी नेमकी कसली शेती करतो हे कळत नाही. शिवाय इतकी महागडी भाजी कोणाला विकली जात असेल, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरं तर या भाजीचं उत्पादन पहिल्यांदा ११ व्या शतकामध्ये करण्यात आलं होतं. ही वनस्पती त्यावेळी बियरमध्ये फ्लेवर आणण्यासाठी वापरली जायची. नंतर या वनस्पतीचा उपयोग औषधी म्हणून व्हायचा आणि आता थेट भाजी म्हणून करण्यात येऊ लागलाय. असं म्हटलं जातं की, शूट्सला एवढी किंमत असण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड मिळतात.  या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो. कॅन्सरसारख्या आजारावर मात मिळवण्यासाठी या वनस्पतीमधील अ‍ॅसिड उपयोगी असल्यानेच ही भाजी जगातील सर्वात महागडी असून त्याची किंमत तब्बल १ लाख रुपये किलो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!