Just another WordPress site

अहमदनगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात ४२ अंत्यसंस्कार



अहमदनगर, (दि. १०)  – गेल्या काही दिवसांपासून देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं मोठा धुमाकूळ घातलाय. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केली. अशातच अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. जिल्ह्यातील नालेगाव इथल्या अमरधाम स्मशानभूमीत कोरोनामुळं दगावलेल्या तब्बल ४२ जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. 


हाईलाईट्स

१. ४२ मृतदेहांवर एकाच वेळी अत्यंसंस्कार  
२. अहमदनगर शहरातील अमरधाममधील घटना
३. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे नागरिकांत भीती
४. जिल्हा प्रशासनापुढे कोरोनाचे मोठे संकट
५. अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी करावी लागते प्रतिक्षा


या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. मात्र, अजूनही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास प्रशासनाला अपयश येत असल्याचं चित्र या घटनेनंतर दिसून आलंय. गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या कोरोनानं जिल्ह्यात  पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरूवात केल्यानं जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली. नगर जिल्ह्यात दिवसागणित कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते.  जिल्ह्यात दररोज सरासरी १५०० च्या आसपास कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. गुरूवारी दिवसभरात तर तब्बल २ हजार २३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. एकाच दिवसात इतके रूग्ण येण्याचा हा वर्षभरातील उच्चांक ठरला असून जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी आता आरोग्य प्रशासनासमोर एक मोठं आवाहन असणार आहे. त्यातच कोरोनामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं नालेगाव अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी रांगाच्या रांगा लागल्यात. एकीकडं कोरोनाची लस उपलब्ध असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या का आणि कशामुळे वाढतेय, याचा विचार करणं प्रशासनाला गरजेचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!