Just another WordPress site

World Suicide Prevention Day 2021 | तरुणांमध्ये वाढते आत्महत्येचं प्रमाण; दर सेकंदाला ४० जण करतात रोज आत्महत्या; आत्महत्येत महाराष्ट्र नंबर वन !

अभिनेता सुशांत सिंह आणि पुण्यातील स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येनंतर आत्महत्या हा विषय अधिकच चर्चिला गेला. आत्महत्येच्या घटना या दुदैर्वी आणि हृदयदावक घटना आहेत. देशात दरवर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. आज आत्महत्या खरोखरच देशासमोरचं नवं संकट म्हणून समोर येतंय का? वाढत्या आत्महत्येचे कारणं काय आहेत? आत्महत्येचे विचार डोक्यात आले तर त्यातून सुटका कशी करावी? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

देशात मागील वर्षात एक लाख ३९ हजार १२३ जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करुन आपलं जीवन संपवतात. म्हणजे जगात दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करत करतात. यावरुन आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य वाढत आहे.


जागतिक आरोग्य संघटनेचे निरिक्षण

जगभरातील वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या विरोधी दिन साजरा केला जातो. आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या व्यक्तींच्या मनाला उभारी मिळावी, त्यांना योग्य औषधोपचार मिळावेत म्हणून ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन’ या संस्थेच्या मदतीने विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार  दरवर्षी जगभारत आठ लाख व्यक्तींकडून आत्महत्या होते. हा आकडा एकूण मृत्यूंच्या १.५ टक्के आहे. फाशी घेणे, किटकनाशक घेणे, जाळून घेणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी जीवन संपवले जाते, असेही निरीक्षणही ‘डब्ल्यूएचओ’ने नोंदवलं.


आत्महत्या करणाऱ्याची लक्षणे काय?

सतत उदास किंवा चिंतेत राहणं, चिडचिडेपणा, अपराधीपणाची भावना, आपण असहाय्य आहोत, आपलं कोणीच नाही असं वाटणं. सतत नैराश्येत राहणं ही सगळी आत्महत्या करणाऱ्याची लक्षणं आहेत.


आत्महत्येची प्रमुख कारणे काय?

जैविक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणांतून आत्महत्या होतात. शिवाय, कोरोना काळात मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा गेला. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे.  व्यसनाधिनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाण आहे. या बाबी देखील आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचं मत या तज्ज्ञानी मांडले.

 – कौटुंबिक कारणांमुळे ३७. ९ टक्के आत्महत्या झाल्याचं समोर आलं. 

– आजारपणातून १७.१ टक्के आत्महत्या झाल्या. 

– व्यसनाधीनतेेमुुळे ५.६ टक्के लोकांनी आत्महत्या केल्या.  

– प्रेमभंगातून ४.५ टक्के आत्महत्या झाल्यास निरिक्षण नोंदवल्या गेलं. 

– कर्जबाजारीपणामुळे ४.२ टक्के आत्महत्या झाल्या.


वयानुसार आत्महत्या करणाऱ्यांची संख्या

सध्याच्या ताणतणावाच्या काळात आणि यशाची चटक लागलेल्या संस्कृतीत तरूण व्यक्ती चटकन ‘स्ट्रेस’ला बळी पडतात. १८ पेक्षा कमी वर्षे वय असलेल्या ९ हजार ६१२ जणांनी म्हणजे,  ६.९  टक्के लोकांनी आत्महत्या केली. १८ ते ३० वयोगटातील  ४८ हजार ७७४ म्हणजे ३५. १ टक्के लोकांनी आत्महत्या तर ३० ते ४५ वयोगटात ४४ हजार २८७ म्हणजे ३१.८ टक्के लोकांनी आत्महत्या केली.


तरूणांमध्ये वाढते आत्महत्येचे प्रमाण

भारतामध्ये गत ५० वर्षांत आत्महत्यांमध्ये तब्बल दीड पटींनी वाढ झाल्याचेही स्पष्ट झालं. विशितल्या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचे सर्वाधिक दुसरे कारण असल्याचे समोर येत आहे. पौगंडावस्थेतील १.२ दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ध्येय साध्य न झाल्यानं तरूणांना आपले जीवन त्यांना व्यर्थ वाटू लागते आणि त्यातून ते टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आलं. देशात २०१८ आणि २०१९ या दोन वर्षाच्या काळातील आत्महत्याच्या आकडेवारीची तुलना  केली तर २०१९ मध्ये  तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ८९ हजार ४०७ तरुणांनी आत्महत्या केली होती, तर २०१९ मध्ये सुमारे  ९३ हजार ०६१ जण तरुणांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं.


भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या 

मानवी मृत्यूची जी काही कारणे आहेत, त्यात आत्महत्येचा क्रमांक दहावा लागतो. जगातील एकूण आत्महत्यांपैकी ३० टक्के आत्महत्या चीन, भारत आणि जपान या तीन देशांत होतात. भारतात पाँडिचेरी हे शहर आत्महत्येचे माहेरघर समजले जाते. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्या पैकी १३. ६ टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ च्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. 


एखाद्याला आत्महत्येपासून परावृत्त कसे कराल? 

खरंतर कोणतीही व्यक्ती एकाककी आत्महत्या करत नाही. बऱ्याचदा नैराश्य आलेल्या व्यक्ती आपण जीव देणार असल्याचे कधी ना कधी बोलून जाते. मात्र त्याकडे आपणं सर्रास दुर्लक्ष केले जाते. अशा व्यक्ती फक्त बोलतात, कृती करत नाहीत, असा आपण समज करून घेतो. अशा व्यक्तींचा इशारा गांभीर्याने घेऊन तात्काळ पावले उचलली पाहिजे. त्यांना बोलते केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, त्यांचे समुपदेशन केले आणि गरजेनुसार उरपचारही केले तर त्यांच्या आत्महत्या रोखता येऊ शकतं, असं मनोविकारतज्ज्ञ सांगतात.


आत्महत्येचे विचार टाळण्यासाठी काय करावे?

– सतत सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा.  मेडिटेशन करावं.  

– दररोज किमान ३० ते ४० मिनिटे भरपूर व्यायाम करा.

– आवश्यक तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

– शक्यतो एकटं राहू नका, आणि व्यसनांच्या आहारी जाऊ नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!