Just another WordPress site

World Asthma Day : काय आहेत अस्थमाची लक्षणं आणि उपचार? जाणून घ्या.

अनेकांना आज अस्थमाचा त्रास जाणवत असतो. हा श्वसनासंबंधीचा आजार असून अस्थमाची समस्या असणाऱ्यांना फुफ्फुसापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहचत नाही आणि मग त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमा विषयी निष्काळजीपणा केल्यास अस्थमा बळावून जीवही गमवावा लागू शकतो. त्यासाठी वेळीच अस्थमाचे लक्षण ओळखून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी आणि स्वतःला सुरक्षित ठेवायला हवं. आज जागतिक अस्थमा दिन आहे. त्याच निमित्तानं आज आपण अस्थमा म्हणजे काय? अस्थमाची नेमकी लक्षणं काय आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.


अस्थमा म्हणजे काय?

श्नसन मार्गाला दाह किंवा सुज आल्यामुळं फुफ्फुसात जाणाऱ्या हवेचा प्रवाह कमी होतो.  त्यामुळं श्वासोच्छास करतांना त्रास होतो. यालाच दमा किंवा अस्थमा म्हणात. थोडक्यात काय तर, श्वसनमार्गात अडथळे आल्यानं किंवा तो बंद झाल्यानं निर्माण होणारी अस्वस्थता म्हणजे दमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळं फुफ्फूसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो. त्यामुळं धापा लागतात. दमा हा आजार अनुवांशिकतेनं अथवा वाढत्या प्रदूषणामुळं तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये उद्भवू शकतो.


जागतिक अस्थमा दिनाची पार्श्वभूमी काय?

दरवर्षी मे महिन्यात येणारा पहिला मंगळवार हा ‘जागतिक अस्थमा दिन’ म्हणून पाळला जातो.

अस्थमा किंवा दमा या आजाराविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि जगभरातील रुग्णांची स्थिती सुधारावी याकरिता ‘ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर अस्थमा’ (GINA) या संस्थेकडून एका वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. यंदा हा दिवस ४ मे रोजी आला.


कोणत्या कारणांमुळे होतो अस्थमा?

अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. याशिवााय,  स्मोकिंग, वायू प्रदूषण, धूळ, धूर, कॉस्मेटिक आणि अगरबत्ती सारख्या सुगंधित वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो. काही अँटी-बायोटिक औषधे, तणाव आणि सिगरेट देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

अस्थमा आजार कसा ओळखावा?

श्वास घेण्यास समस्या, श्वास घेताना शिटीचा आवाज येणे, शिंका येणं, खोकला येणे, छातीत दुखणं ही सगळी अस्थमाची लक्षणे आहेत. शिवाय वातावरणात जरा बदल झाल्यास दमा उद्भवू शकतो. दम लागणं, छाती भरल्यासारखं वाटणं, घरघर करणं ही देखील दम्याची लक्षणं आहेत.

अस्थम्या विषयीचे गैरसमज काय आहेत?

अस्थमा किंवा दमा या आजारा विषयी समाजात अनेक गैरसमजुती आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की, दमा हा सर्दी-खोकल्यासारखा कधी तरी येणारा आजार आहे. आणि केमिस्टकडून साधी औषधं घेतल्या जातात. मात्र या गैरसमजामुळे अस्थमाचा आजार बळावण्याची शक्यता वाढते. कधी कधी त्यातून तीव्र स्वरूपाचा झटका येऊ शकतो. दम्याविषयीची सर्वात अडचणीची ठरणारी बाब म्हणजे अर्धवट उपचार. जरा बरं वाटायला लागलं की औषधे घेणं थांबवून देतात. त्यामुळं अशा अर्धवट उपचारामुळे अनेकदा हा आजार बळावतो. त्यामुळं अस्थम्याची लक्षणं जाणवत असल्यास वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.


अस्थमा असलेल्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी?

अस्थमाच्या रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. थंड आणि आंबट वस्तूंचं जास्त सेवन करून नये. धूळ, धूर आणि धुम्रपानापासून लांब राहावे. घरातील पाळीव प्राणी प्राण्यांच्या संपर्कात जास्त येऊ नये. कारण प्राण्यांच्या केसांमुळे दमा वाढण्याची शक्यता अधिक आहे. तसंच, घरातील हवा खेळती ठेवावी. घरात हवा स्वच्छ ठेवणारे प्युरीफायर अथवा एसी वापरावा. कुठंही बाहेर प्रवास करत असाल तर नाकाला मास्क लावला पाहिजे. घरातील बेडशिट्स, रोजच्या वापरातील कपडे दिवसाआड गरम पाण्यानं धुवा. एकंदर, तुमचं राहतं घर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असलं पाहिजे. गडद सुंगंध असलेले परफ्युम वापरु नका. महत्वाचं म्हणचे, नियमित व्यायाम व योग्य आहार घ्या.


दम्यासाठी काय उपचार आहे?

अस्थमा पुर्णपणे नाहीसा करण्यासाठी कोणताही उपचार नाही. मात्र यावर नियंत्रण मिळवता येतोय.  अस्थमाला नियंत्रण करण्यासाठी औषधांचे नियमित सेवन करणं गरजेचं आहे. यासाठी इंहेलर्स सर्वात चांगले औषध आहे. इंहेलर्सने औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोहचतं, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. होमिओपॅथीतही अस्थमा विषयी औषधे दिलेली आहेत. आंबा, हळद, लवंग, हिंग, सुंठ, लसूण, कांदा, गाजर या वनस्पतींच्या मुळाचा रस औषधी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावा.


अस्थमा विषयीची आकडेवारी

दिवसेंदिवस वातावरणाच्या प्रदूषणामुळं अस्थमा रुग्णांची संख्या वाढतेय. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या अहवालात जगभरात एकूण १५० दशलक्ष रुग्ण आढळून आलेत. त्यातील १२ ते २० टक्के रुग्ण हे एकट्या भारतात आहेत. देशात ४ ते ५ कोटी अस्थमा किंवा दम्याचे रुग्ण असल्याची नोंद आहे. तर ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्येही अस्थमा वाढत असून भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अस्थमा किंवा दम्याच्या रुग्णांकडून उपचाराबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याने दरवर्षी दीड कोटीपेक्षा अधिक रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे.

अस्थमा विषयी कोणताही निष्काळजीपणा न करता योग्य ती खबरदारी घ्या आणि स्वत:चं आरोग्य जपा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!