Just another WordPress site

Why is a mirror installed in an elevator? लिफ्टमध्ये आरसा का बसवण्यात येतो? आरसा लावण्यामागे नेमकं कारण काय? वाचा

तुम्ही एखाद्या अपार्टंमेंटमध्ये राहात असाल तर तुम्हाला रोज लिफ्टमधून चढण्या उतरण्याचा अनुभव असेल. आता तर जवळपास प्रत्येक इमारतीला लिफ्ट असते आणि लिफ्टमध्ये आरसा. लिफ्ट मध्ये गेल्यावर आपण पहिली कुठली गोष्ट करत असू तर ती लिफ्ट मधल्या आरश्यात स्वतःला बघणे. लिफ्टमध्ये गेल्यागेल्या आपण तिथल्या आरश्यात बघून आपले केस नीट करतो, टाय व्यवस्थित करतो, लिपस्टिक निघाली असेल तर लिपस्टिक लावतो. पण, तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का?  की मोठाल्या इमारतींच्या लिफ्टमध्ये आरसा का असतो?खरंतर लिफ्ट ही फारच मोठी क्रांती मानली जाते. कारण ५-६ मजले पायऱ्यांनी चढणं हे फार कष्टाचं वाटू शकतं. आता तर २०-२० मजल्यांच्या इमारती येताहेत. त्यामुळे लिफ्टही फारच उपयुक्त अशी गोष्ट झाली. जगभरात औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाली, जवळपास त्याच दरम्यान उंच इमारती बनवायला प्रारंभ झाला. मग, त्यापाठोपाठ या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा आली. १८५३ साली लिफ्टचा शोध लागला. लिफ्टचा शोध लागल्यानं इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यात आल्या. लोक या लिफ्टचा वापर करू लागले. खरंतर जेव्हा लिफ्टचा शोध लावला गेला तेव्हा त्यात आरसे नव्हते. मग अचानक असे काय झाले की यात आरसे बसवावे लागले. तर जेव्हा पहिल्यांदा लिफ्टचा वापर करण्यात आला, तेव्हा लोकांनी पायऱ्यांऐवजी लिफ्टमध्ये जाण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना लिफ्टमध्ये आपला खूप वेळ खर्च होत असल्याचं वाटू लागलं. त्या काळातील लिफ्ट फारच हळूहळू वर जायची. यावर लोक संतापायचे.  त्यानंतर लिफ्टचा वापर करणाऱ्यांनी लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीकडे लिफ्ट खूपच धीम्या गतीनं काम करत असल्याची तक्रार लागले.  मग कंपन्या देखील ह्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात लागल्या.  तर काही कंपन्यानी लिफ्टच्या स्पीडवर फोकस केला. पण हे सर्व खूप खर्चिक होतं. त्यामुळे  वैज्ञानिकांनी  यासाठी एक युक्ती शोधून काढली. लोकांच्या तक्रारी येऊ नये यासाठी त्यांनी  लिफ्टचा वेग आणखी वाढवण्यापेक्षा लोकांच लक्ष दुसरीकडे वळवण्यावर फोकस केला. कंपन्यांच्या लक्षात आलं की, लोकांना लिफ्टची स्पीड यासाठी कमी वाटते,  कारण त्यावेळी त्यांच्याकडे करायला काहीही नसते. यावर एक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे लिफ्टमध्ये आरसे लावावे. लिफ्टमध्ये आरसा लावला गेला तर लोक स्वत:ला न्याहाळण्यात मग्न होतील, त्यामुळे आपोआपच त्यांचा वेळही जाईल आणि लिफ्टच्या स्पीडकडे त्यांचं लक्ष नसेल. आणि तसेच झाले. खरोखरच ही युक्ती कामी आली. लिफ्टमध्ये आरसे लावल्यानंतर लोकांच्या स्पीड बाबत तक्रारी येणं बंद झाल्या.  यानंतर एक सर्व्हे देखील करण्यात आला आणि लोकांना विचारण्यात आले की, आता लिफ्टच्या स्पीड कसा वाटतो, स्पीडमध्ये काही फरक पडला का? ह्या प्रश्नावर लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. लोकांच्या मते आधीपेक्षा आता लिफ्ट जास्त गतिमान झाली आहे. मुळात त्या लिफ्टच्या वेगात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.  कंपन्यांनी केवळ लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी लिफ्टमध्ये आरसे लावले. जेणेकरून लोक व्यस्त राहतील आणि त्यांचे लक्ष हे लिफ्टच्या वेगावर जाणारच नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!