Just another WordPress site

Who invent Bra ? ‘ब्रा’हा शब्द आला कुठून? ब्रा बनली कशी आणि ब्रा घालायची सुरूवात कधीपासून झाली?

बिग बॉस ४ ची विजेती आणि छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एका वक्तव्याने देशभर खळबळ माजली. ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत आहे,’असं वक्तव्य करत श्वेतानं वाद ओढवून घेतला. या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकाही होतेय. तिला माफीही मागावी लागली.  ब्रा बद्दल उघडपणे बोलणं देखील आपल्या देशात निषिद्ध मानलं जातंय. दरम्यान, ‘ब्रा’ हा शब्द आला कुठून ? ब्रा बनली कशी ? ब्रा घालायची सुरूवात कधीपासून झाली ? या विषयी जाणून घेऊ. 

हायलाईट्स

१. ब्रा हे ब्रॅसीअर या फ्रेंच शब्दाचे संक्षिप्त रुप 

२. ग्रीसच्या इतिहासात ‘ब्रा’सारख्या वस्त्रांचं चित्रण 

३. पहिली आधुनिक ब्रा फ्रान्समध्ये बनवण्यात आली

४. १९१४ साली मेरी फेल्प्सने घेतले ब्रा चे पेटंट


‘ब्रा’ म्हणजे काय?

ब्लाउजखाली स्त्रियांनी घातलेलं अंतर्वस्त्र म्हणजे ब्रा. ब्रा हे ब्रॅसीअर या फ्रेंच शब्दाचे संक्षिप्त रुप आहे. स्तनांना आधार देण्यासाठी किंवा झाकण्यासाठी डिझाइन केलेले अंडरगारमेंट म्हणून ब्राची ओळख आहे. 


‘ब्रा’चा इतिहास काय? 

ब्रा बद्दल कोणताही इतिहास नाही. मात्र, १४ व्या शतकात सुद्धा मोनोयन इतिहास पाहिला तर लक्षात येईल की,  ग्रीस आणि रोमनच्या इतिहासात देखील ‘ब्रा’ सारख्या दिसणाऱ्या वस्त्रांचं चित्रण आहे. रोमन काळातल्या महिला त्यांचे स्तन झाकण्यासाठी छातीभोवती एक कपडा बांधत असत. याउलट ग्रीक इतिहासात महिला स्तनांखाली एक पट्टा बांधून स्तनांना उभारी देत असत.


‘ब्रा’ घालण्याचा ट्रेंड कसा सुरू झाला?

सगळ्यात आधी पहिली आधुनिक ‘ब्रा’ फ्रान्समध्ये तयार करण्यात आली. १८६९ साली फ्रान्सच्या हर्मिनी कॅडोल यांनी सर्वात आधी ही रचना केली होती. लोखंडी कॉर्सेटला दोन तुकड्यांमध्ये तोडून त्यांनी ही ब्रा ची रचना तयार केली होती आणि सगळ्यात आधी या अंतवस्त्राला ‘ब्रा’ म्हटलं गेलं. काही काळानंतर फ्रान्समध्ये ‘ब्रा’ विक्रीसाठी देखील बाजारात येऊ लागले. मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर धातूंचा तुटवटा निर्माण झाला आणि लोखंडी कॉर्सेट्स वापरणं बंद झालं. या लोखंडी कॉर्सेट्सच्या ऐवजी नंतर वेगवेगळ्या कपड्यांमधले कॉर्सेट्स येऊ लागले. अगदी राजघराण्यातल्या आणि श्रीमंत महिला हे कापडी कॉर्सेट्स फॅशन म्हणून सुद्धा वापरत होत्या. मात्र, हे कॉर्सेट मागच्या बाजुने अगदी घट्ट आवळून बांधले जात होते. त्यामूळे ते आरोग्याला हानिकारक असल्याचं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं. आधुनिक ब्राचा शोध १८६९मध्ये लागला. मात्र,  आज आपण ज्या प्रकारची ब्रा दुकानात पाहतो तशी १९३० मध्ये अमेरिकेत तयार करण्यास सुरुवात झाली. आशियात मात्र ब्रासंबंधी स्पष्ट असा इतिहास सापडत नाही. जस जशी मानवी संस्कृती बदलली तस तसं ‘ब्रा’ चा इतिहास देखील बदलत गेला.  सध्याच्या काळात अनेक महिला पुश-अप ब्रा वापरतात. ही पुश-अप ब्रा संकल्पना १९ व्या शतकाच्या सुरवातीला उदयास आली होती. लंडनच्या विज्ञान संग्रहालयात ठेवण्यात आलेली पुश-अप ब्रा ही त्याचा पुरावा आहे.


‘ब्रा’च्या आगमनाच्या वेळी झाला होता विरोध

प्रसिद्ध फॅशन मॅगझिन व्होगने १९०७ च्या सुमारास ब्रॅसीअर हा शब्द लोकप्रिय करण्यात मोठी भूमिका बजावली.  तेव्हापासून अमेरिका आणि इतर देशातील महिलांमध्ये ‘ब्रा’ वापरण्याची सुरवात झाली.  विशेष म्हणजे यासोबतच ब्रालाही विरोध झाला होता. स्त्रीवादी संघटनांनी महिलांना ब्रा घालण्याच्या धोक्यांचा इशारा दिला  होता. त्यामुळे महिलांनी अक्षरशः ब्रा रस्त्यावर पेटवून दिल्या होत्या. महिला सुंदर दिसाव्यात म्हणून ब्रा वापरली जाते आणि महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टीकोण तयार होतो, असा आक्षेप घेत हा विरोध करण्यात आला. 


‘ब्रा’ चे पेटंट कुणी घेतले? 

१९११ मध्ये ऑक्सफर्ड शब्दकोशात ब्रा हा शब्द जोडण्यात आला. यानंतर, १९१३ मध्ये, अमेरिकेतील सुप्रसिद्ध सोशलाईट मेरी फेल्प्सने सिल्क नॅपकिन्स आणि रिबन्सपासून स्वतःसाठी ब्रा बनवली आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे, १९१४ तिचे पेटंट घेतले. मेरीने बनवलेली ब्रा आधुनिक ब्राचे प्रारंभिक रूप मानले जाऊ शकते. मात्र, त्यात अनेक त्रुटी होत्या. ही ब्रा स्तनांना आधार देण्याऐवजी सपाट करत होते. हे फक्त एकाच आकारात उपलब्ध होते.


‘ब्रा’ ला महिलांनी दाखवली केराची टोपली 


सन १९२१ मध्ये अमेरिकन डिझायनर आयडा रोसेन्थलने वेगवेगळ्या कप आकारांची कल्पना सुचली आणि सर्व प्रकारच्या शरीरासाठी ब्रा बनवल्या गेल्या. त्यानंतर ‘ब्रा’च्या प्रचार आणि प्रसाराचा जो काळ इथपासून सुरू झाला तो आजतागायत कायम आहे. १९६८ मध्ये सुमारे ४०० महिला  ‘मिस अमेरिकन ब्युटी पेजंट स्पर्धेचा निषेध करण्यासाठी एकत्र आल्या.  त्यावेळी  त्यांनी इतर गोष्टींबरोबरच ब्रा, मेकअपचे सामान आणि उंच टाचांचे सामान कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. ज्या डस्टबिनमध्ये या गोष्टी टाकल्या जात होत्या त्याला फ्रीडम ट्रॅश कॅन असं म्हणण्यात आलं..  महिलांना सौंदर्याच्या पातळीच्या चौकटीत बसवण्याची ही धडपड असल्याचं सांगत हा विरोध करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!