Just another WordPress site

Who are the Amrapali guns? कौतुकाची गोष्ट! मुंबईच्या आम्रपाली गन बनल्या ओन्ली फॅन्सच्या सीईओ; कसा आहे त्यांचा इथवरचा प्रवास?

गेल्या महिन्याभरात जगात भारतीय महिलांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक होतंय. यात अलिकडेच हरनाज कौर संधुने  मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो. तर फॅशन ब्रँड शनेलच्या सीईओपदी लीना नायर यांची निवड झाली. यातच आता आम्रपाली गनची भर पडली. मुळच्या मुंबईच्या असलेल्या आम्रपाली गन या आता अडल्ट कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म ओन्ली फॅन्सच्या सीईओ झाल्यात. दरम्यान, अडल्ट कंटेंट क्रिएशन नेमकं काय आहे? आणि त्याच्या सीईओ बनलेल्या आम्रपाली गन आहेत तरी कोण? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.



हायलाईट्स

१. ओन्ली फॅन्सचे संस्थापक टिम स्टोकली यांनी दिला राजीनामा 

२. भारतीय वंशाची आम्रपाली बनली अडल्ट वेबसाइटची CEO

३. २०२० मध्ये ओन्ली फॅन्ससोबत जोडली गेली होती आम्रपाली

४. ओन्ली फॅन्सच्या माध्यमातून सेलिब्रिटी होतात चाहत्यांशी कनेक्ट 


अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म ओन्ली फॅन्सने भारतीय वंशाच्या आम्रपाली ‘एमी’ गन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून नियुक्ती केली. ओन्लीफॅन्सचे संस्थापक ३८ वर्षीय टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी ओन्लीफॅन्सची स्थापना केली. तेव्हापासून ते पाच वर्षे या पदावर कार्यरत होते.  दरम्यान, आता नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि थोडी विश्रांती म्हणून आपण हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्रपाली यांच्याकडे सीईओ पद सोपवत टिम स्टोकलीने सांगितले की, “ती खूप चांगली सहकारी तसेच माझी एक चांगली मैत्रिण असून मी तिच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवत आहे. तिच्याकडे दूरदृष्टी आहे आणि संस्थेला तिच्या प्रचंड उंचीपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी क्षमता आहे, असा विश्वास टिमने यांनी व्यक्त केलाय. आम्रपाली गन यांचा जन्म मुंबईत झाला असून त्या केवळ ३६  वर्षांच्या आहेत. कंपनीचे संस्थापक टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्रपाली गन यांची निवड करण्यात आली.  आम्रपाली यांचे शिक्षण हॉवर्ड बिजनेस स्कुलमधून झालंय. त्याचप्रमाणे त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हरसिटीमधून पब्लिक रिलेशन अॅन्ड ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन पदवी घेतलीये…  तसेच त्यांनी एफआयडीएम या संस्थेतून मर्केन्टाईज मार्केटिंगचे शिक्षणही पूर्ण केलंय. आम्रपाली यांनी याआधी रेडबुल आणि क्वेस्ट न्यूट्रिशनसाठी काम केलंय. या शिवाय  स्टाईलसेंटच्या मार्केटिंग मॅनेंजर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसंच   पेप्सिकोच्या मार्केटिंग लिडरशिफ प्रोग्रॅमच्या प्रमुख त्या प्रमुख होत्या.  तर २०२० मध्ये त्या ओन्ली फॅन्समध्ये चीफ मार्केटिंग आणि कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून कार्यरत झाल्या होत्या. इथं त्यांनी मार्केटींग आणि कम्युनिकेशन या विभागाच्य प्रमुखपदी काम केलं, तर आता त्यांची ओन्ली फॅन्सच्या सीईओपदी निवड झाली. ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मबद्दल एक समज आहे की येथे फक्त अ‍ॅडल्ट आणि अश्लील कंटेंट उपलब्ध आहे. मात्र,  सत्य काहीतरी वेगळंच आहे. ओन्ली फॅन्सच्या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होतात. यातून सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये कमावतात.  प्रसिद्ध अभिनेत्री बेला थॉर्न ही या प्लॅटफॉर्मवरवरील सर्वाधिक चर्चेत असलेली एक आहे. जेव्हा बेलाने एका दिवसात एक दशलक्ष डॉलर्स कमावले होते, तेव्हा ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मला त्यांचे धोरण बदलावे लागले होते. याशिवाय पॉप स्टार कार्डी बी, प्रसिद्ध रॅपर टायगा, हॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता मायकल जॉर्डन यांसारख्या अनेक प्रसिद्ध स्टार्सनी या प्लॅटफॉर्मद्वारे करोडो रुपये कमावलेत. ओन्लीफॅन्सचे १८० दशलक्ष नोंदणीकृत यूजर्स आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!