Just another WordPress site

What is CDS। बिपीन रावत यांच्या निधनाने रिक्त झालेलं CDS पद काय आहे? काय असतं CDSचे काम?

भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्‍यांच्‍या अकाली निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्‍का बसला. त्यांच्या निधनाने संरक्षण दल प्रमुख अर्थात सीडीएस हे पद रिक्त झालं. हे पद अधिक काळ रिक्त न ठेवता येण्यासारखं नसल्यानं आता या पदासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला. रावत यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाची सीडीएस पदी निवड होणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं. दरम्यान, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे काम काय असते? त्यांचा कालावधी किती असतो? त्यांना काय सुविधा आणि पगार दिला जातो? या विषयी जाणून घेऊया. 



CDS म्हणजे काय? 

सीडीएस म्हणजे, तीनही दलांतील सर्वाच्च पद. ही कल्पना सर्वप्रथम लॉर्ड माउंटबॅटन यांनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०१९ ला लालकिल्ल्यावरून CDSची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर संरक्षण विभागातील मंत्रिमंडळाच्या समितीनं CDS पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली. वयाच्या ६२ व्या वर्षी ते लष्करप्रमुख म्हणून लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत हे देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  होते. बिपिन रावत ३१ डिसेंबर २०१९ पासून या पदाचा कार्यभार सांभाळायला सुरूवात केली. त्याआधी तीन वर्षे जनरल रावत हे लष्करप्रमुख होते.  

CDS चा कार्यकाळ किती आहे?

CDS चा कार्यकाळ ३वर्षे किंवा ६५ वयाच्या वर्षांपर्यंत असतो, यापैकी जो आधी पूर्ण होईल, तोपर्यंत असतो. तर लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख मात्र वयाच्या ६२ व्या वर्षी निवृत्त होतात. जनरल बिपिन रावत यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच हे पद निर्माण करण्यात आले होते.


CDS सैन्यातील सर्वोच्च अधिकारी 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे भारतीय सैन्य दलातील सगळ्यात मोठे पद आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा  ४ स्टार अधिकारी असतो. तो ज्या सैन्याच्या विभागाशी संबंधित असतो, तोच गणवेश हा सर्वोच्च अधिकारी परिधान करतो. त्याच्या चिन्हात, सैन्याच्या तीन भागांची चिन्हे अशोक चक्रासह सोन्याच्या धाग्याने बनविली जातात. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या ऑफिसमध्ये एक अतिरिक्त सचिव आणि पाच सह सचिव आणि सपोर्ट स्टाफ असतो. त्यांच्यासोबत मिळून तो लष्कराच्या तिन्ही दलांसोबत मिळून काम करतो. तसेच  इतरही भमिका निभावतो.


CDS या पदावरील व्यक्ती काय कामे करतो ?

लष्कर, वायूदल आणि नौदल यांच्या कामकाजात समन्वय साधणं तसंच देशाची लष्करी ताकद वाढवणं, हे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं प्रमुख काम आहे. प्रामुख्यानं ते संरक्षणमंत्र्यांच्या मुख्य संरक्षण सल्लागाराच्या भूमिकेत असतात. 

याशिवाय,- 

१.  शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रिया पार पाडणे 

२. सैन्याच्या तिन्ही विभागांना एकत्रित करुन उत्तम काम करणे  

३. लष्करी सल्लागारासह लष्करी व्यवहार विभागाशी डील करणे  

४. आवश्यक असेल तेव्हा थिएटर कमांड बनवणे 

५. लष्कराच्या तिन्ही विंगच्या एजन्सी, संस्था आणि संबंधित सायबर आणि स्पेसचे कमांडिंग करणे ही कामे सीडीएस पदावरील व्यक्ती करतो.

६. न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणून काम करणे

७. तिन्ही सैन्यदलाच्या सुधारणेचे कार्यक्रम पुढे नेऊन अनावश्यक खर्चात कपात करून सशस्त्र दलांची ताकद वाढवणे हे काम सीडीएस करतो. 

CDS ला पगार किती असतो?

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा पगार लष्कराच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांच्या बरोबरीने म्हणजेच अडीच लाख रुपये असतो. शिवाय, त्यांना बंगल्यासह इतरही अन्य सुविधा मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!