Just another WordPress site

काजू खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात? रोज किती काजू खावेत?

जेव्हा आपण पौष्टिक पदार्थांबाबत त्यातही सुका मेव्याचा विचार करतो तेव्हा आपण फक्त बदाम, अक्रोड किंवा ब्राझील नट्सचा विचार करतो, लोकांना असे वाटते की काजू हा काही आरोग्यदायी पर्याय नाही. लोकांचा असा समज आहे की, काजू हे फक्त जिभेचे चोलले पुरविण्यासाठीच खाल्ले जातात आणि त्याच बरोबर त्यातील चरबीमुळे आपलं वजन देखील वाढतं. पण, काजू हा अनहेल्दी पदार्थ नाही. तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. पॉलिफेनॉल, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्समुळे काजू हे सर्व सर्वात आरोग्यदायी आहे. त्यामुळे काजू हे फक्त चव म्हणून खाण्याऐवजी तो एक पौष्टिक पदार्थ म्हणून खावा.

फायटिक ऍसिड कमी करते

काजूमध्ये फायटिक अॅसिड असते, जे पचायला सोपे नसते, अशा स्थितीत तुम्ही काजू भिजवून खाल्ल्यास त्यातून फायटिक अॅसिड बाहेर पडते आणि ते सहज पचायला सोपे जाते. फायटिक ऍसिडमुळे काहीवेळा पोटाचा त्रास होतो. काही लोकांना त्याची ऍलर्जी देखील असते. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही भिजवलेले काजू खाऊ शकता.

काजू पोषकतत्त्वे वाढवण्यासाठी उपयुक्त

काजूमध्ये आढळणारे फायटिक अॅसिड शरीरातील खनिजांचे शोषण रोखते. त्यामुळे शरीरात काही खनिजांची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत भिजवलेले काजू खाल्ल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. जेव्हा तुम्ही भिजवलेले काजू खातात, तेव्हा ते फायटिक ऍसिडचे तुकडे करतात आणि लोह, जस्त, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारख्या खनिजांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यासाठी शरीरातील प्रमाण वाढवते.

वजन कमी करण्यात उपयुक्त

भिजवलेल्या काजूमध्ये भरपूर कॅलरी, प्रोटीन आणि फायबर असतात ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्याच वेळी, त्यातील फायबर चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

जेव्हा तुम्ही भिजवलेले काजू खातात तेव्हा ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरते. काजू शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत करते.

काजू हे मेंदूला चालना देणारे आहे

भिजवलेले काजू मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूचे कार्य वाढवण्यास आणि तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात.

महिलांसाठी काजू जास्त फायदेशीर

काजू विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहेत. कारण काजूमध्ये असलेले एस्ट्रोजेन हे महिलांसाठी निरोगी हार्मोन्सची पातळी राखण्यास मदत करू शकते. याशिवाय काजूमध्ये अ‍ॅनाकार्डिक अ‍ॅसिडही असते. जे खाल्ल्याने शरीरावर नैसर्गिक अँटी-एस्ट्रोजेन प्रभाव पडतो. पण, लक्षात ठेवा की असामान्यपणे उच्च एस्ट्रोजेन पातळीमुळेृ स्त्रियांना गर्भाशयाच्या फायब्रॉयड, पीएमएस, वेदनादायक मासिक पाळी आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या रोगांना बळी पडू शकते. शरीरात एस्ट्रोजेनसारखे कार्य करणार्‍या कृत्रिम रसायनांच्या संपर्कात आल्याने अतिरिक्त एस्ट्रोजेन उत्तेजित होऊ शकते.

एका दिवसात किती काजू खावेत?

मूठभर किंवा सुमारे २० ग्रॅम काजू खाल्ल्याने शरीराला योग्य अ‍ॅनाकार्डिक अ‍ॅसिड मिळू शकते. एक चतुर्थांश कप काजू हे प्रथिने, चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळविण्यासाठी पुरेसे असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आता आपण बिनधास्त काजू खाऊ शकता.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!