Just another WordPress site

VPN बंदीची देशात चर्चा; वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बसणार फटका

गृहमंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने सायबर धोक्यांचा इशारा देत भारतातील व्हीपीएन सेवांवर बंदी घालीवी अशी मागणी केली.  समितीनुसार, व्हीपीएन अॅप्स आणि साधने ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत. या व्हीपीएन सेवा आणि डार्क वेब सायबर सुरक्षा भिंतींना बायपास करू शकतात आणि गुन्हेगारांना ऑनलाइन निनावी राहू देतात. म्हणूनच भारताने व्हीपीएन कायमस्वरूपी ब्लॉक करण्यासाठी एक समन्वय यंत्रणा विकसित केली पाहिजे, असं संसदीय समितीनं अहवालात सांगितलं. व्हीपीएन म्हणजे काय? व्हीपीएन सेवांचे फायदे काय आहेत? व्हीपीएन बंदी प्रस्ताव काय आहे? याच विषयी आज आपण  जाणून घेणार आहोत.

व्हीपीएन हे भारतातील बहुतेक कंपन्या त्यांचे नेटवर्क आणि  त्यांची डिजिटल मालमत्ता  हॅकर्सपासून  सुरक्षित करण्यासाठी वापरतात. लॉकडाऊन दरम्यान, कर्मचाऱ्यांना व्हीपीएनद्वारे घरातून काम करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरले.


काय आहे व्हीपीएन?


व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. व्हीपीएन म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगायच झालं तर इंटरनेटच्या माध्यमातून दोन कॉम्प्युटर एकमेकांशी जोडले जातात. मात्र,  त्यांची जोडणी ही  खासगी स्वरूपाचीच असेलच याची खात्री देता येत नाही. ही जोडणी खासगी स्वरूपाची असावी आणि माहितीच्या हस्तांतरणाची गोपनीयता टिकवता यावी यासाठी व्हीपीएनचा वापर केला जातो. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या माध्यमातून दोन कॉम्प्युटर इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जातात. आणि त्यांच्या भोवती एक आभासी नेटवर्क तयार केले जाते, त्यात अन्य कोणाही प्रवेश मिळू शकत नाही. 


व्हीपीएन बंदीच्या प्रस्तावात काय सांगितलं? 

गृहमंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी समन्वय साधणं आवश्यक असून इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या मदतीने व्हीपीएन ओळखून ते ब्लॉक करण्याचं सांगितलं. भारतातील बेकायदेशीर कामांसाठी वापरल्या जाणारे व्हीपीएन कायमस्वरुपी ब्लॉक करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय एजन्सीसोबत समन्वय यंत्रणा विकसित करण्याचंही संसदीय स्थायी समितीने सुचवलं. समितीने आपल्या अहवालात सांगितलं की, व्हीपीएन सेवा आणि डार्क वेबद्वारे उद्भवलेली तांत्रिक आव्हानं सायबर सुरक्षा भिंतींना ओलांडू शकतात आणि गुन्हेगारांना ऑनलाइन जगतात अज्ञात राहू देतात. त्यामुळे समितीने केंद्राला प्रभावीपणे गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या व्हीपीएनवर कारवाई करत भारतात व्हीपीएनचा वापर बॅन करण्याची विनंती केली. मात्र अद्याप हे समजलेले नाही की बॅन कधी केले जाईल.


व्हीपीएन बंदीची मागणी का? 

व्हीपीएनचा वापर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या उद्देशासाठी करतात. असे अनेक लोक आहेत, जे याचा वापर भारतात उपलब्ध नसलेला कंटेन्ट म्हणजे ban conten स्ट्रीम करण्यासाठी करतात. यासोबतच अवैध गोष्टींचा म्हणजे, ज्या गोष्टी भारतात बॅन आहेत, त्याचा वापर करण्यासाठी सुद्धा करतात. त्यामुळे  व्हीपीएन बंदीची मागणी केली जाते.


व्हीपीएनचा फायदा काय?  

व्हीपीएन वापरतांना गोपनीयता बाळगली जाते. कंपन्यांसाठी त्यांच्या कामगारांना जगात कोठूनही प्रवेश मिळविण्याचा व्हीपीएनचा वापर करणं एक चांगला मार्ग आहे.


तांत्रिक ज्ञान नसल्यास व्हीपीएन वापरू नका

आपल्याला तांत्रिक ज्ञान नसल्यास व्हीपीएनचा वापर करू नये.कारण याद्वारे आपल्यावर सायबर हल्ला करणेदेखील तेवढेच सहज शक्य आहे. शिवाय व्हीपीएन जोडणी गोपनीय असल्यामुळे आपल्यावर झालेल्या सायबर हल्ल्याचा तपास करणे हे सुरक्षा यंत्रणांसाठी अवघड ठरू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!