Just another WordPress site

Vasim Rizvi । कोण आहेत वसीम रिझवी? मुस्लीम विरोधी वक्तव्य करून घेतली हिंदू धर्माची दिक्षा

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच विधान केले. मला मृत्यूनंतर दफन न करता हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जावेत,  अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, वसीम यांनी धर्मपरिवर्तनाचा निर्णय घेत हिंदू धर्म स्विकारला. आज सकाळी साडेदहा वाजता  डासन देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज यांनी वसीम रिझवी यांना हिंदू धर्माची दिक्षा दिली. त्यामुळे वसीम रिझवी चर्चेत आले असून वसीम रिझवी कोण आहेत? याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. 


हायलाईट्स

१. वसीम रिझवी यांची शिया नेते म्हणून ओळख 

२. वसीम हे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष

३. रिझवी यांनी बॉलिवूडमध्येही नशीब आजमवले 

४. ‘राम की जन्मभूमी’ चित्रपटाची केली निर्मिती

वसीम रिझवी हे शिया नेते म्हणून ओळखले जातात.  त्यांनी कुराणातल्या २६ आयतींवर आक्षेप घेत हटवण्याची मागणी केली, त्यावेळेस ते चर्चेत आले. याशिवाय, भारतात मदरशांना बंदी घालावी, त्यामुळे दहशतवादाच्या निर्मितीला चाप लागेल, बाबरी मशीद म्हणजे हिंदुस्थानच्या धरतीवर कलंक आहे, अशी वादग्रस्त वक्तव्य वसीम यांनी केली. त्यामुळे रिझवी आपल्याच धर्मातील लोकांच्या निशाण्यावर आले. रिझवींच्या ह्या भूमिकेवार शिया आणि सुन्नी दोन्हींचे मौलवी तुटून पडले. जो कुणी रिझवींचं डोकं छाटेल त्याला १० लाख आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल, असं बक्षिस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कॉन्सिलनं जाहीर केलं. वसिम यांच्या विरोधात जोरदार निदर्शेने केली जाताहेत.  वसीम यांनी केलेल्या मुस्लीम विरोधी वक्तव्यांमुळं त्यांना मुस्लीम असल्याचं नाकारलं जातं. दरम्यान, त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जाते. वसीम  हे २००८  साली ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे मेंबर झाले.  पुढं याच शिया बोर्डाचे ते अध्यक्षही झाले. २०२० पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. रिझवी यांचा सक्रिय राजकारणात देखील सहभाग होता. २००० साली रिझवी हे समाजवादी पार्टीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडूण आले.  २०१२ साली त्यांची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी झाली. २०१८ मध्ये रिझवींनी मदरशांमध्ये समलैंगिक संबंध वाढतात असा आरोप केला. एवढच नाही तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप केला. वसीम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि लिखाणामुळे अनेकवेळा धार्मिक तेढ निर्माण झाली आणि वसीम रिझवी आणि वाद हे समीकरण तयार झालं. त्यामुळं वसिम हे कट्टरतावाद्यांच्या पहिल्यापासून निशाण्यावर आहेत.  दरम्यान, रिझवी यांनी बॉलिवूडमध्येही नशीब आजमवण्याचे देखील प्रयत्न केला. २०१९ मध्ये त्यांनी  निर्माते म्हणून  राम की जन्मभूमी चित्रपट लॉन्च केला. या चित्रपटाची पटकथा वसिम रिझवी यांनी लिहीली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!