Just another WordPress site

Tyre Colur | प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं?

लहान असतांना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. आकाश निळं का असतं?, सकाळी कोंबडा का आरवतो, रात्री सूर्य कुठं जातो? यासारखे असंख्य प्रश्न आपल्यालाही पडले असतील आणि तुम्हीही तुमच्या आईबाबांना हे प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल. मात्र, कधी तुम्हाला हा प्रश्न पडला का, की गाडी कुठल्याही प्रकारची असली तरीही तिचं टायर काळ्या रंगाचं  कसं?  वाहनं तांत्रिकदृष्ट्या प्रगत केलं जातं, मात्र, त्याच्या टायरचा रंग मात्र लाल-हिरवा-पिवळा होत नाही. तो काळाच का राहतो ? याच विषयी आज आपण पुढील काही वेळात जाणून घेणार आहोत. 

मानवाच्या प्रगतीचे काही टप्पे मानले जातात. चाकाचा शोध ही त्यातील एक महत्वाची घटना म्हणावी लागेल. चाकाच्या शोधामुळे दळणवळण सुखकर बनले. लाकडी चाकापासून ते वाहनाच्या स्टीलच्या चाकापर्यंत आपली प्रगती झाली आहे.


पूर्वी असायची लाकडाची टायर

खंरतर लाकडाच्या चाकाने सुरू झालेला हा प्रवास १८९५ पासून रबर टायर्स मध्ये परिवर्तन झालं. रबरचा मूळ रंग हा पांढरा असतो आणि म्हणून सुरुवातीला टायर हे पांढऱ्या रंगात असायचे. १८८० मध्ये ज्या कार तयार व्हायच्या त्यामध्ये टायर्स हे पांढऱ्या रंगात बसवले जायचे.


आता टायर काळ्या रंगाचे का असतात? 


पूर्वी टायर पांढऱ्या रंगाचे असायचे. मात्र, कालांतराने टायर्स तयार करणाऱ्या कंपनीच्या हे लक्षात आलं की, पांढऱ्या रंगामुळे चाक हे कमी काळ त्याच्या मूळ स्वरूपात रहायचं. कारण, टायर हे रबराचे बनवलेले असतात. रबराचा रंग हा पांढरा असतो आणि रबरापासून टायर फार लवकर घासले जात होते. त्यामुळे टायरच्या मजबूतीवर प्रश्न उपस्थित होत होते. त्यातल्या त्यात मोटार सायकल किंवा कार म्हटलं की, चाकांना घर्षणाचा मोठा सामना करावा लागतो. पुढं या समस्येवर संशोधन झाले आणि यातून एक नामी उपाय शोधण्यात आला. रबरी टायर तयार करताना त्यात सल्फर आणि कार्बन मिसळण्यात आले. या कार्बन आणि सल्फरमुळेच टायरला त्याचा काळा रंग मिळाला.  हा फॉर्म्युला इतका जबरदस्त लागू झाला की याला आजतागायत कोणी बदललेलं नाही. गाडी कितीही स्टायलिश असली तरी टायर मात्र काळाच ठेवला जातो तो याच कारणामुळे.


काळे टायर दणकट असतात

पांढऱ्या रबरचं टायर 8 हजार किलोमीटर प्रवास करेपर्यंत चांगलं टिकतं. कार्बनयुक्त रबरचं टायर 1 लाख किलोमीटरचा प्रवास झाल्यावर खराब होतं. टायर तयार करताना रबरात कार्बनसोबत सल्फरही टाकतात, त्यामुळे दणकटपणा वाढतो आणि हेच कारण आहे की जगभरात वापरल्या जाणाऱ्या टायरचा रंग काळा असतो.


रंगीत टायरही असतात

लहान मुलांच्या सायकलींचे टायर हे वेगवेगळ्या रंगांचे असतात. त्यामुळे ते टायर्स दिसायला आकर्षकही दिसतात. महत्वाचं म्हणजे, या रंगीत टायरमध्ये कार्बन वापरला जात नाही. त्यामुळे हे टायर्स काळ्या रंगाचे नसतात, तर रंगीबेरंगी असतात. याचं कारण म्हणजे,  लहान मुलांचं वजन हे कमी असतं, त्यामुळं त्यांच्या सायकलींची टायर खूप दणकट असायची गरज नसते. त्यामुळे लहान मुलांच्या सायकलींची टायर रंगीत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!