Just another WordPress site

धनुष्यबाण गोठवल्याने ठाकरे आणि शिंदे गटाला आता मिळणार ‘हे’ पक्षचिन्ह

नवी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पसंती क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर देण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पर्यायांचा विचार केंद्रीय निवडणूक आयोग करत या असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे

शिवसेनेकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल हे 3 चिन्ह पाठवली आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं सेनेनं निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे.
पण, उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग दोन्ही चिन्ह नाकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच वेळी जर एकाच चिन्हावर दोन्ही गटाने दावा केला तर चिन्ह बाद केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदे गटाकडून तीन नावं सुद्धा ठरली आहे. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी ३ नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!