Just another WordPress site

Tabligi Jamat । तबलीगी जमात हे काय प्रकरण आहे? या संघटनेचा इतिहास काय आहे? ते काय करतात?

कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या  ‘तबलिगी जमात’ भारतात वादग्रस्त ठरली होती. याच तबलिगी जमात संघटनेवर सौदी अरेबिया सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केलाय. सौदी सरकारने दहशतवादाच्‍या प्रवेशव्‍दारांपैकी एक आणि समाजासाठी धोकादायक असा ठपका लावत तबलिगी जमात या संघटनेवर बंदी घातली. दरम्यान, तबलिगी जमात म्हणजे काय? या संघटनेचा इतिहास काय आहे?  ही संघटना नेमकं काय काम करते? याच विषयी जाणून घेऊया. 


सौदी अरेबीयाचे इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ. अब्दुललतीफ अल – अलशेक यांनी सोशल मीडियाच्या सहाय्यानं ‘तबलिगी जमात’वर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यामुळं या संघटनांमध्ये सामील होण्यापासून सावध राहण्याचा इशारा मशिदींतून देण्यात आला. 

काय आहे तबलीगी जमात?

सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी धार्मिक  संघटना म्हणून ‘तबलिगी जमात’ ओळखली जाते.तबलीगी जमातचा अर्थ आहे की अशा लोकांचा समूह जो अल्लाह आणि दीनचा प्रचार-प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह आहे. साधारणता: ८५ वर्षापूर्वी म्हणजे,  १९२६  सालापासून ही संस्था कार्यरत आहे. इस्लामिक विद्वान आणि शिक्षक मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी ‘धार्मिक सुधारणा चळवळ’ तबलिगी जमात ही संघटना सुरू केली होती. ‘तबलिगी जमात’ विशेषत: इस्लामच्या अनुयायांना धार्मिक प्रवचन देण्याचं काम करत होती. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. तबलीगी जमातचा पहिली जाहीर कार्यक्रम  १९४१ मध्ये झाली होता. त्यावेळी अंदाजे २५ हजार लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ही मुसलमानांची जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत.  जेम्सटाउन फाऊंडेशनच्या अहवालात असे म्हटले आहे की जमातने पारंपारिकपणे राजकारणापासून दूर राहून मुस्लिमांचा विश्वास दृढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एका अहवालानुसार, तबलिगी हे प्रामुख्याने मिशनरी होते ज्यांनी मुस्लिम समाज बदलण्याचा आणि मुस्लिमांना सत्याच्या मार्गावर परत आणण्याचा प्रयत्न केला.


संघटनेचे नेमकं काम काय? 

इस्लाम ऑन द मूव्ह या पुस्तकांत सांगितले की,  तबलिगी हे प्रामुख्याने मिशनरी होते ज्यांनी मुस्लिम समाजात परिवर्तन करण्याचा आणि मुस्लिमांना सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. चळवळ मुख्यतः सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचून त्यांचा धर्मावरील विश्वास पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि त्यांना विधी, पेहराव आणि वैयक्तिक वर्तन या विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कार्य करते.  जगभरातील इतर अनेक मिशनरी चळवळींप्रमाणे, ती धर्माच्या बाहेरील लोकांना नव्हे तर आतल्या लोकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करते, असं पुस्तकात सांगितले. या संघटनेचा उद्देश हा केवळ ‘इस्लामची पाच मूलभूत तत्त्वे समजावून सांगणं’ असाच होता. मुस्लिम धर्माचे प्रसार हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. विशिष्ट प्रकाराची राहणी, कपडे, व्यक्तीगत आयुष्यातील व्यवहार यासाठी या संघटनेचा आग्रह आहे. संगठनेचा उद्दिष्ट फक्त धार्मिक असून राजकीय घडामोडींपासून संगठना अलिप्त असते असे या संगठनेतील सदस्यांचा दावा आहे. 

सहा कलमी कार्यक्रम कोणता? 

तबलीगीच्या धर्मप्रचाराचे सहा कार्यक्रम आहेत

कलमा – कलमाचं वाचन करणे

सलात – दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे

इल्म – इस्लामचं शिक्षण घेणे

इकराम ए मुस्लीम – मुस्लीम समुदायातील लोकांचा सन्मान करणे

इख्लास ए नियत – प्रामाणिक उद्देशाने काम करणे.

दावत ओ तबलीग – इस्लामचा प्रचार करणे

प्रचार कसा केला जातो?

जमातीतील ८-२० लोकांचा एक गट केला जातो. नंतर कोणत्या गटाने कुठं प्रचारासाठी जावं, हे सांगितलं जातं. ठरल्याप्रमाणे हे लोक गावोगाव जातात आणि तिथं इस्लामचा प्रचार करतात. जे लोक त्यांच्यात सामील होतात त्या लोकांना इस्लामचं महत्त्व सांगितलं जातं. नमाज पठण झाल्यावर कुराणचं वाचन केलं जातं


किती मोठी आहे तबलीगी जमात? 

प्यु रिसर्च सेंटरनुसार,  तबलिगी जमातीची चळवळ १५०हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. तबलीगी नेटवर्क संपूर्ण भारतीय उपखंडात मजबूत आहे. दक्षिण आशियातील इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, पाकिस्तान आणि थायलँडमध्ये  सुमारे १५ ते २५ कोटी नागरिक या संघटनेसी जोडले केले आहेत. या संघटनेकडून भारतात भोपाळ, मुंबईतील नेरुळ, दिल्‍लीतील निजामुद्‍दीन, बांगलादेशमधील ढाका आणि पाकिस्‍तानमधील लाहौर नजीकच्‍या रायविंड शहराजवळ मरकझचे आयोजन केले जाते.

तबलीगीवर दहशतवादी कारवायांचा आरोप 

आता मात्र, ही संघटना कट्टरतावादी आणि दहशतवादी कृत्यांसाठी ओळखली जाते.  तबलीगी पुनरुज्जीवन करणारी संगठना असल्याचे युनाटेड स्टेट्स ऑफ पीसने म्हटले आहे. अनेक दहशतवादी कारवायांच्या चौकशीत ही संघटना समोर आली आहे. इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेत दहशतवादी कारवायासाठी तबलीगीने छुपा पाठिंबा दिल्याचा संगठनेवर आरोप झाला.

भारतातही झाली होती तबलीगींवर कारवाई 

२०२० मध्ये भारतात कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली तब्लिगी जमात वादात सापडली होती. दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्लिगी जमातच्या सदस्यांवर कारवाई झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटकही केली होती. 


अनेक देशांमध्ये तबलीगी जमातीवर बंदी

२०१३ मध्ये कझाकिस्तानने तबलिगी जमातला अतिरेकी संघटना म्हणून बंदी घातली. इराण, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या देशांमध्येही यावर बंदी आहे. दरम्यान, दारुल उलूम देवबंदने १२ डिसेंबर रोजी एका निवेदनात सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयावर टीका केली. तबलीगी जमातवरील दहशतवादाचे आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा :  गांधी परिवारातील संजय गांधी वादग्रस्त का ठरले? आणीबाणीच्या काळात त्यांनी कुठले निर्णय घेतले?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!