Just another WordPress site

Swiss Bank | ‘ब्लॅक मनी’ स्वीस बँकेतच का ठेवला जातो? स्वीस बँक नेमकी आहे तरी काय ?

स्वीस बँके विषयी आपल्या प्रत्येकानं कधीतरी काही ऐकलंलं असतं.  मोठ्या उद्योगपतींनी- राजकीय असामींनी स्वीस बँकेत काळा पैसे ठेवल्याचे अनेकदा आपण वर्तमानपत्रात वाचलेले असते.  केवळ भारतातीलचं नाही तर जगातल्या असंख्य धनदांडग्यांची संपत्ती याच बॅंकांमध्ये बंदिस्त आहे. मोदींनी देखील अनेकदा स्वीस बॅंकांमधला काळा पैसा परत आणू, असं आश्वासन दिलं होतं. ही स्वीस बॅंक आहे तरी काय? ही बॅंक कुठे आहे? या बॅंकेमध्ये लोक पैसे का ठेवतात? काळा पैसा म्हणजे अनधिकृत आहे तर मग ही बँक पैसा स्वीकारतेच का? भारतीयांचा किती पैसा या स्वीस बँकेत आहे ? याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.


स्वीस बँक काय आहे?

आपल्यापैकी अनेकांना हे वाटत असेल की स्वीस बँक ही एकच कोणतीतरी बँक आहे, मात्र, तसं नाही. स्वीस बँक अशा नावाची मुळातच कुठली एक बँक नाही. स्वित्झर्लंड देशामध्ये जेवढ्या बँका आहेत त्यांना स्वीस बँक म्हटलं जातं. आणि त्यात युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड आणि क्रेडिट स्वीस या दोन महत्वाच्या बँका आहेत. यातील युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड या बँकेत सगळ्यात जास्त पैसे ठेवले जातात. स्वित्झर्लंड हे जगातील सगळ्यात स्टेबल आणि चांगली अर्थ व्यवस्था असलेल्या देशांपैकी एक आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे स्वित्झर्लंडमधील बँकांवर लोकं विश्वास ठेवतात. 


काळा पैसा लोक स्वीस बँकेत का ठेवतात?

स्वीस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे महत्वाचं कारण आहे, या देशातील बँक पॉलीसी! आपल्या प्रायवसी पॉलिसीमुळे स्वीस बँकमध्ये प्रचंड गोपनियता पाळली जाते आणि ती तिथल्या बँकिंग कायद्याला धरूनच आहे. १९३४ मध्ये या देशाने एक बँकिंग कायदा संमत केला, ज्यानुसार जर स्वीस बँकेने त्यांच्याकडे असणाऱ्या खातेदारांची नावे आणि माहिती उघड केली तर तो कायदेशीर अपराध मानला जाईल. त्याबदल्यात त्या बँकेवर कठोर कारवाई करण्यात येईल. याच कायद्यामुळे स्वीस बँकेत कुणाचं खातं आहे, त्यात किती पैसे आहेत, खातेदाराबाबतची माहिती ही कुणालाही दिली जात नाही. या बँकेत पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी अगदीच मामुली कर लागतो. शिवाय पैसे ठेवण्यावर व्याज मात्र मजबूत मिळतं. या सगळ्या कारणांमुळे लोक स्वीस बॅंकेत पैसे ठेवण्याला प्राधान्य देतात. स्विस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे अजून एक कारण म्हणजे, स्विस बँक  हे कधी विचारात नाही की तुम्ही हा पैसा कुठून आणला? त्यांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या मार्गाने पैसा कमावता. शिवाय, स्वीस बँक कमरशिअल लोन फार कमी देतं,  त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता  कमी आहे.  स्वीत्झर्लंड सरकार जागतिक राजकारणात तटस्थ  भूमिका घेतं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचं चलन आणि सरकार दोन्ही स्टेबल असतं…. त्यामुळं स्वीस बँकेतील खाती ही जगात सगळ्यात जास्त सुरक्षित मानली जातात. आणि म्हणूनच काळा पैसा लपवायचा असेल तर अनेक जण आपला पैसा स्वीस बँकेत वळवतात.  मात्र, एखाद्या गुन्हेगारा विरोधात न्यायालयामध्ये खटला सुरु असेल तर स्वित्झर्लंडचे न्यायालय त्या व्यक्तीची सर्व माहिती आणि गुपिते उघड करण्याचे आदेश देऊ शकते. 


भारतीयांचा किती काळा पैसा स्वीस बँकेत आहे?

स्वित्झरलॅंडमधील बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा करण्यात येत असलेल्या पैशांचे प्रमाण मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०१९ मध्ये जे आकडे समोर आले होते, त्यानुसार स्वीस बँकेत भारतीयांचे ६ हजार ६२५ कोटी होते. मात्र कोरोना काळात स्वीस बँकेत जवळपास तब्बब तीन पटींनी वाढ होऊन ही रक्कम २० हजार ७०० कोटींहून अधिक रक्कम असल्याचं समोर आलं. आश्चर्य म्हणजे मागील १३ वर्षांतील या बॅंकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.


जसं आपल्या इथे बँकेमध्ये खातेसुरु करण्यासाठी काही अटी आणि नियम ठेवलेले असतात तसे स्वीस बँकांचे देखील काही अटी आणि नियम आहेत.


स्वीस बँकेत खाते उघडण्यासाठी काय आहेत अटी – नियम?

१. खातेदाराचे वय किमान १८ असावे. 

२. खातेदाराने खात्यामध्ये किमान

३.२१ ते ६.२४ करोड रुपयांचा बॅलेन्स राखण्याची गरज आहे. 

४. स्वीस बँकेमध्ये खाते हे स्वत: तेथे प्रत्यक्ष जाऊन सुरू करावे लागते.

 किंवा स्वीस  बँकेच्या प्रतिनिधी मार्फत सुरू लागते. इंटरनेटच्या माध्यमातून स्वीस बँकेमध्ये खाते उघडता येत नाही. 


खातेदाराला ट्रॅक करणे अशक्य 

स्वीस बँक आपल्या खातेदारांना एक युनिक नंबर देते, म्हणजे यात खातेदाराला स्वत:चे नाव देण्याची गरज भासत नाही. अशी खाती केवळ नंबरने उघडली जातात. खातेदाराला त्या नंबरच्या सहाय्याने संपूर्ण व्यवहार हाताळता येऊ शकतात. तसेच कोणीही व्यक्ती या नंबरचा वापर करून खाते हाताळू शकतो. त्याला ते खाते त्याचेच आहे हे सिद्ध करण्याची गरज भासत नाही. तो नंबरच सर्व गोष्टींसाठी पुरेसा आहे. त्यामुळेच खाते नेमक्या कोणा व्यक्तीचे आहे हे शोधून काढणे जवळपास अशक्य आहे. एवढचं नाही तर ठराविक नंबरचे खाते कोणत्या व्यक्तीचे आहे हे तर खुद्द स्विस बँकेला देखील ठावूक नसते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!