Just another WordPress site

Sukhadev Dhere । – TET पेपरफुटी प्रकरणी सुखदेव डेरेंना अटक, कोण आहेत सुखदेव? त्यांचा पेपरफुटीशी काय संबंध?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणं समोर आली. आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं. त्याचे थेट धागे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या आयुक्तापर्यंत  पोहोचले असून अखेर राज्य सरकारने त्याचं निलंबन केलं. तर आज आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. सुखदेव डेरे अस या अधिकाऱ्याचं नाव आहे. डेरे यांना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली. दरम्यान, सुखदेव डेरेआहेत तरी कोण? याविषयी जाणून घेऊया.

हायलाईट्स
१. काही दिवसांपासून परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणं समोर
२. परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक
३. पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई
४. आणखी एका आरोपीला बंगळुरूमधून घेतले ताब्यात


टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली. तर याच प्रकरणात बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं ही कारवाई केली. आतापर्यंत या प्रकरणात  ५ आरोपींना अटक करण्यात आली.  टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, २०१७ पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झाल. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीये. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे २०१७ साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून २०१८ साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याच समोर आलंय. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे २०१७ ते २०२० या काळात शिक्षण परिषदेचं परीक्षा घेण्याचं कंत्राट होतं. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांनी आज अखेर पोलिसांनी अटक केली. सुखदेव डेरे यांचे  संगमनेर तालुक्यातील काकडवाडी हे मुळ गाव असून त्यांचं माध्यमिक शिक्षण हे  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव इथं झालं. तर माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपलं  उच्च माध्यमिक आणि बी. एड. चे शिक्षण संगमनेर शहरात झालं. आपलं बी. एड. झाल्यावर संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात डेरे यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. दरम्यान, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून त्यांनी MPSC परीक्षा पास केलीय आणि ते सरकारी सेवेत रुजू झाले. पुढं त्यांनी नंदुरबार येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी, औरंगाबाद येथे शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक, एस. एस. सी.  बोर्डात अध्यक्ष म्हणून ही कामकाज केलं आणि शेवटी परीक्षा परिषदेचे आयुक्त पदावरून ते सेवा निवृत्त झाले. मागील गेल्या  तीन वर्षांपासून संगमनेर शहरातील अकोले बायपास भागात वास्तव्य त्यांचं वास्तव्य आहे. दरम्यान, आज त्यांनी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीतून पेपरफुटी प्रकणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहोचतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!