Just another WordPress site

Sinior Singee Pass Away : ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन; ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


पुणे  : संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणाऱ्या संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज पहाटे निधन झालं आहे.  त्या ७० वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले.  २०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.  कीर्ती शिलेदार यांच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘कीर्तीताईंच्या निधनामुळं मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!