Just another WordPress site

Shivsena & sambhaji brigade : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती, नव्या राजकीय समीकरणाचा भाजपला होणार तोटा?

शिंदे यांच्या बंडामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेनेचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने भरारी घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला.  उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली. दरम्यान, या यूतीचा नेमका फायदा कुणाला होईल? ही युती भाजपसमोर नेमकं काय आव्हान उभं करेल? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युतीची घोषणा 

२. शिवसेना- संभाजी ब्रिगेड एकत्र लढवणार निवडणुका 

३. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा भाजपला फटका 

४. युतीमुळे बहुजन समाज शिवसेनेच्या पाठीशी राहील

मातोश्रीवर झालेल्या पत्रकारपरिषदेत शिवसेना- संभाजी ब्रिगेड युती संदर्भातील घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार आहे. सोबतच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं सांगण्यात आलं.यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे.  संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.  तर गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. आता लोकशाही धोक्यात आली.  छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान,  शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी  उद्धव ठाकरे यांच्याकडून धडपड मोठी धडपड करण्यात आली. आता  संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. शिवसेनेची २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतरची भूमिका आणि संभाजी ब्रिगेडची आजवरची आरएसएस विरोधी भूमिका याचे सुर कुठंतरी जुळत असल्यानं या युतीमुळे मराठी समाजाची एकजुट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय जाणकार सांगतात.दुसरं म्हणजे, शिवसेना हा कट्टर हिंदूत्ववादी विचारांचा पक्ष असल्यानं शिवसेनेची भूमिका ही अन्य मतदारांना सर्वसमावेशक वाटत नाही. आणि संभाजी ब्रिगेड ही पक्ष संघटना फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा मानणारी असून या संघटनेला मराठा समाजा शिवाय, अन्य समाजातही स्वीकार्यता आहे. याचा मोठा फायदा शिवसेनाला निवडणूकांमध्ये होऊ शकतो. संभाजी ब्रिग्रेड- शिवसेना युतीमुळे फुले-शाहू- आंबेडकर विचारांचा पाईक असलेला मतदार हा शिवसेनेच्या बाजूने झुकण्याची मोठी शक्यता असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. ज्या पध्दतीने या युतीचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे, तसाच फायदा संभाजी ब्रिगेडलाही होणार आहे. शिवसेने सारखं संभाजी ब्रिगेडंच राजकीय संघटना मजबूत नाही. आणि शिवसेना-संभाजी ब्रिगेड यूती ही अचानक झालेली नाही. तर ही जाणीवपूर्वक झालेली युती असून हा संभाजी ब्रिगेडच्या  राजकीय विस्ताराचा भाग असल्याचे राजकीय जाणकारांना वाटतं. दरम्यान, या शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीत  सगळ्यात मोठा तोटा भाजपला बसू शकतो.  कारण, आजवर भाजपकडून मराठ्यांच्या मताचं विभाजन करून मराठी माणसाची बाजू घेणाऱ्या पक्षांना नामोहरम करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, आता शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीनं मराठा समाजाजं संघटन मजूबत होईल.  याचा निवडणूकांमध्ये भाजपला मोठा फटका बसु शकतो. दुसरं म्हणजे, या युतीमुळे आजवर जे प्रस्थापित मराठा नेते भाजपसोबत गेले त्यांनाही आगामी सगळ्याचं निवडणूकांमध्ये फटका बसण्याची शक्तता असल्यानं ते भाजपशी फारकत घेऊन शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीत सहभागी होऊ शकतात, त्यामुळं आपोआप भाजप सोबतचा मराठा समाज भाजपपासून दुरावला जाण्याची शक्यताही वर्तवली जातेय. दुसरं म्हणजे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने इतर मराठा संघटनांसह आंदोलन केले. अजूनही संभाजी ब्रिगेड त्यावर काम करत आहे. अशावेळी मराठा समाजातील मतदारांना आकर्षित करण्यात हे दोन्ही पक्ष यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान, भगदाड झालेल्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेड कशी ठिगंळ लावतं? अन्   भाजप हा सेना-ब्रिगेडच्या युतीचं आवाहन कसं पेलतो,  हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!