Just another WordPress site

sexually abuses a minor girl a man | नराधमाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार


सांगली : राज्यात कितीही कठोर नियम केले तरी अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या शाररिक अत्याचाराच्या सुन्न करणाऱ्या घटना समोर येत आहेय. आता सांगलीमधून समोर आली.  सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या अल्पवयीन मित्र मैत्रिणींनीच नराधम आरोपीला साथ दिल्याचा आरोप पीडित मुलीनं आपल्या तक्रारीत केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. मुस्तफा हुसेन पठाण, खालीद मुसा मुल्ला अशी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित आरोपींची नावं आहेत. तर रोहन कुरणे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आपल्या घरी जात असताना मुस्तफा याने तिचा रस्ता अडवला होता. यानंतर याठिकाणी आलेल्या रोहन कुरणे यानं पीडित मुलीला आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तिला एका घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीनं या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, नऊ दिवसांपूर्वी आरोपीनं पीडित मुलीवर अशाच प्रकारे दुसऱ्यांदा अत्याचार केलाय.  याबद्दल कोणाला काही सांगू नकोस, अशी  धमकी करून आरोपी कुरणे आणि मुस्तफा याने पीडित मुलीला तिच्या घरी सोडलं होतं. हे प्रकरण पीडित मुलीच्या वडिलांना कळाल्यानंतर आरोपींनी तिच्या वडिलांना देखील धमकी दिली होती. दरम्यान, पीडितेनं या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं अखेर इस्लामपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणात कुरणेला पीडित मुलीची अल्पवयीन मैत्रीण आणि एका अल्पवयीन मुलानं मदत केली, असं पीडितेनं तक्रारीत सांगितलंय. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली. तर सध्या मुख्य आरोपीचा शोध सूरु असून घटनेचा पुढील तपास पोलीस करताहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!