Just another WordPress site

Sexual abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ : राज्यात कितीही कठोर नियम केले तरी अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत.. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या शाररिक अत्याचाराच्या सुन्न करणाऱ्या घटना समोर येता आहेत. अशीच एक घटना आता यवतमाळमधून समोर आलीये. एका अल्पवयीन मुलीने मैत्रीण असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राकडून अत्याचार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या  घडल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहीतीनुसार, झरी तालुक्यातील एका गावात ही पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. शुक्रवार १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान तिच्या मैत्रिणीने शौचास जाण्याच्या बहाणा करून तिला सोबत नेले. मात्र शौचास न जाता तिने तिला गावातीलच सुनील टेकाम याच्या घरी नेले. मुलीला आरोपीच्या हवाली करुन तिची मैत्रीण परत घरी निघून गेली. तर आरोपी सुनील टेकाम यांने पीडितेचा हात धरून बळजबरीने घरामागे असलेल्या बाथरूममध्ये ओढत नेत पीडीतेवर अत्याचार केला. दुसरीकडे शौचास गेलेली मुलगी बराच वेळ होऊन परत आली नसल्यामुळे चिंतीत मुलीचे आई-वडील मुलीचा शोध घेण्यासाठी गावात फिरत होते.  दरम्यान, सुनील टेकाम याच्या घरातील बाथरूम जवळ मुलगी दिसून आली. आई-वडीलांनी विचारणा केली असता पीडितेने घडलेला सगळा प्रकार  सांगितला. घटनेच्या तिसऱ्या दिवशी पीडित मुलीच्या आईने आरोपी सुनील टेकाम आणि त्याला सहकार्य करणाऱ्या अल्पवयीन मुली विरुध्द पोलिसात तक्रार नोंदवली. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!