Just another WordPress site

मारेकऱ्यावर खटले न चालवता भरचौकात फासावर लटकवा, दिल्लीतील हत्या प्रकरणार संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या प्रकरणात कुणी राजकारण करु नये, मारेकऱ्यावर खटले न चालवता भरचौकात त्याला फासावर लटकवा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणावर कोणीही राजकारण करु नये, असंही म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं आहे की, “आमच्या महाराष्ट्रातील मुलीची ज्याप्रकारे हत्या झाली, ते अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाज माध्यमांवरुन ओळखी होतात आणि त्या ओखळींचं रूपांतर भयंकर नात्यात होतं. आणि ज्या पद्धतीनं त्या मुलीचे तुकडे तुकडे करुन मारलंय, त्या मुलीच्या वडिलांची मुलाखत मी आता वाचत होतो की, त्या मुलीच्या वडिलांचा, कुटुंबीयांचा आक्रोश आहे. त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे.”

“कोणत्या धुंदी आणि गुंगीत ही मुलं जगतायत, हे आज पुन्हा एकदा कळलंय. आपला जीव गमावताय. अशा लोकांना जे खूनी आहेत, हत्यारे आहेत. यांच्यावर खटलेही चालवू नयेत. या प्रकरणावर राजकारण कोणी करत असेल तर ते बंद केलं पाहिजे. यांच्यावर खटले न चालवता, हा जो परिस्थितीजन्य पुरावा समोर दिसतोय, त्या आधारे त्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे.”, असंही संजय राऊत म्हणाले.

“आपल्या मुलींनीही सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे. अशाप्रकारे फसवून जे काही केलं जातंय ही विकृती आहे. पण विकृतीपेक्षाही पुढचं पाऊल आहे. जे रोज खुलासे होतायत, ती थरारक आहे. आम्ही आमच्या मुलींकडे पाहतो की, आम्ही कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो. यावर कोणी कोणत्याही प्रकारचं राजकारण करत असेल, तर तेसुद्धा समाजाचे शत्रू आहेत, असं मी मानतो.” , असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!