Just another WordPress site

Rules Changing From 1st December | उद्यापासून मोठ्या बदलांची शक्यता, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतात

  बऱ्याचदा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नवीन नियम लागू होतात  किंवा जुन्या  नियमात बदल केला जातो. ज्याचा आपल्या जगण्यावर परिणाम होत असतो. उद्या डिसेंबर  महिन्याला सुरूवात होते. डिसेंबर महिन्यातदेखील काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. या महिन्यात अनेक बदल दिसणार असून त्याचा बोझा तुमच्या खिशावर पडू शकतो. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना फटका बसणार आहे, तर दुसरीकडे एलपीजी  सिलिंडरच्या किंमतीतदेखील वाढ होणार आहे. १ डिसेंबर पासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. या डिसेंबरमध्ये सामान्य नागरिकांशी निगडीत कोणते नियम बदलणार आहेत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया.


हायलाईट्स

१. आता आगपेटी देखील दुप्पट महाग होणार 

२. घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता !

३. पंजाब नॅशनल बँकेने बदलले आपले व्याजदर

४. SBI क्रेडिट कार्डने EMI वर शॉपिंग करणे महागणार


गॅस सिलिंडरचे दर वाढू शकतात 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर त्याचे नवीन दर निश्चित केले जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जारी केले जातात. दरम्यान पेट्रोल-डिझेल, सीएनजी पीएनजीचे वाढते दर पाहता गॅस सिलेंडरची किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

होम लोन ऑफर 

सणासुदीच्या काळात बहुतांश बँका वेगवेगळ्या होम लोनच्या ऑफर देत असतात. यापैकी अनेकांमध्ये कमी व्याजदर आणि जीरो प्रोसेसिंग फीस चा देखील समावेश असतो. मात्र, बहुतेक बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर ला संपतात. एलआयसी हाऊसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपते.


एसबीआय क्रेडिट कार्ड

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डने EMI वर शॉपिंग करणे महागणार आहे. सध्या, SBI कार्ड वापरण्यासाठी फक्त व्याज द्यावे लागते, मात्र, 1 डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील आकारले जाईल.


यूएएन-आधार  लिंकिंग आवश्यक 

तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत आधारशी लिंक करा. 1 डिसेंबर पासून, कंपन्यांना फक्त UAN आणि आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांचेच ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरण्यास सांगितले.  याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याचा UAN आधार पडताळला नसेल, तर ECR दाखल केला जाणार नाही आणि अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्याकडून पीएफमध्ये मिळणारे योगदान थांबवले जाऊ शकते.  याशिवाय, जर तुम्ही आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला EPF खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. दरम्यान यूएएन आधार लिंकिंगसाठी यापूर्वीच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत वाढवून एक डिसेंबर 2021 करण्यात आली होती. आता मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा नसल्याने, तुम्हाला येत्या तीन दिवसामध्ये यूएएनला आधार लिंक करावे लागेल, अन्यथा तुमचा पीएफ खात्यात जमा होणार नाही.


सात लाखांचा विमाही जाईल

जर तुमचे आधार कार्ड यूएएनला लिंक नसेल तर तुमचे आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते, एप्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विम्यासाठी देखील ईपीएफओकडून आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर विम्याचा हप्ता देखील रोखण्यात येईल, आणि तुम्हाला विम्यापासून वंचित राहावे लागू शकते.


माचिसची किंमत दुप्पट केली जाईल 

आजपर्यंत सर्वांत स्वस्त वस्तू म्हणून आगपेटीकडे पाहिले जात होते. मात्र, १ डिसेंबर पासून आगपेटीची किंमत 14 वर्षांनंतर दुप्पट होणार आहे. 1 डिसेंबर 2021 पासून, तुम्हाला माचिस बॉक्ससाठी 1 रुपयांऐवजी 2 रुपये खर्च करावे लागतील. आगपेटी बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दरवाढ करावी लागतेय, असं आगपेटी निर्मात्यांचे म्हणणे आहे.


पंजाब नॅशनल बँकेचे व्याजदर बदलले

पंजाब नॅशनल बँकेने  खातेदारांना धक्का दिलाय. पंजाब नॅशनल बॅंक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची बॅक आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदर 2.90 वरून 2.80% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून नवे दर लागू होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!