Just another WordPress site

Pot of Soil :मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?


आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. आज केवळ काही घरांमध्ये  आपल्याला  मातीचा माठ दिसून येतो. आणि  काही ठिकाणी फक्त दही लावण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करण्यात येतो.  मात्र तुम्हाला माहीत आहे का? पूर्वीच्या काळात पदार्थ बनवण्यासाठीही मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येत असे. खरं तर मातीच्या भांड्यांमध्ये जेवण तुम्ही शिजवून खाल्ल्यास, तुम्हाला नैसर्गिक फायदे जास्त मिळतात. मातीच्या भांड्यातील शिजवून खाल्लेल्या जेवणाचे काय फायदे होतात? मातीच्या भांड्यात स्वयंपाक करतांना काय काळजी घ्यावी? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

आत्ताच्या जीवनशैलीमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कमी वेळेत कशा होतील? हे हवं असत. मात्र, अनेकदा गोष्टी पटापट करण्यामुळे त्या गोष्टींचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो. आज स्वयंपाक करण्यासाठी अनेक वेगवेगळी उपकरणं  बाजारात आहेत. या उपकरणातून काम जरी पटकन होत असलं तरी त्याचा शरीराला फायदा होत नाही. त्यामुळे मातीच्या भांड्यातील स्वयंपाकाला प्राधान्य देणं गरजेचं आहे.


काय आहेत मातीच्या भांड्यातील स्वयंपाकाचे फायदे? पाहूया.


स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण 


मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेले जेवण हे अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते. महत्वाचं म्हणजे, मातीच्या तव्यावर चपाती करतांना मातीचे जे तत्व चपातीमध्ये शोषले जातात, त्यामुळे चपातीची पौष्टिकता वाढते.


गॅस होत नाही 

मातीच्या तव्यावरील चपाती खाल्यानं गॅसचा त्रास जाणवत नाही. जर तुम्हाला दिवसभर ऑफिसमध्ये बसून गॅस सारखी समस्या होत असेल तर तुम्ही मातीच्या तव्यावरिल चपाती नक्की ट्राय केली पाहीजे. वारंवार पोटात गॅस होत असतील तर तुम्ही आवर्जून मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्लं पाहीजे. त्यामुळं गॅस सारखी समस्या होत नाही.


पोषक तत्त्वं मिळतात

तुम्हाला माहित असेल की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारणपणे १८ पोषक तत्त्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही पोषक तत्त्व मिळण्यास मदत होते. 



कॅल्शियम, सल्फर, सिलीकॉन आणि कोबाल्ड अशी अनेक पोषक तत्त्वं मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मिळतात.


मातीचा तवाच का? 

असं म्हटलं जात की, मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही. 


अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील तब्बल ८७ टक्के पोषकतत्वे कमी होतात तर, पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्यानं ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. मात्र, महत्वाचं म्हणजे, केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात. त्यामुळं मातीचा तवा महत्वाचा आहे.


मातीची भांडी खरेदी करतांना आणि त्यात स्वयंपाक बनवतांना काय घ्यायची घ्यावी?

मातीच्या भांड्यात जेवण करतांना काही काळजीही घेणं आवश्यक आहे. जसं की, मातीचा तवा वापरताना कमी आचेवर वापर करावा. तसंच हा तवा पाण्याच्या संपर्कात येऊ देता कामा नये. चपात्या बनवून झाल्यानंतर मातीचा तवा कपड्याने स्वच्छ करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे, मातीची भांडी खरेदी करतांना त्याचा तळ बघावा. तो जाड असायला हवा. नाहीतर उष्णतेने भांडे तडकू शकते. नवीन मातीची भांडी आणल्यानंतर ती किमान २४ तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवावी. २४ तासानंतर भांडी व्यवस्थित सुकवाव. या भांड्याचा वापर झाल्यावर काही अन्नकण त्यात अडकून राहू शकतात. म्हणून या भांड्यांचे काम झाले की त्यात गरम पाणी ओतून स्वच्छ करावी. त्यामुळं तेलाचा तवंग, अन्नकण सहज निघून येण्यास मदत होते.

मातीच्या भांड्यातील जेवण फक्त स्वादिष्टच नसतं तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी बनवतं.


हे देखील वाचा :

बेळगाव महानगरपालिकेत भाजपला यश; महाराष्ट्र एकीकरण समितीला हुलकावणी; एकीकरण समितीचं काय चुकलं?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!