Just another WordPress site

दहावी पास असणाऱ्यांना राज्याच्या ST महामंडळात काम करण्याची संधी, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग चंद्रपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२२ असणार आहे.

 

कोणत्या पदांसाठी भरती?

शिकाऊ उमेदवार

 

एकूण जागा – ८३

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिकाऊ उमेदवार (Apprentice) :
– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
– तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
–  तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

 

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

महाराष्ट्र राज्य परिवहन, चंद्रपूर विभाग, चंद्रपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!