Just another WordPress site

Non Cabinet Goverment : सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडेना, महाराष्ट्रच नाही तर ‘या’ राज्यातही होते मंत्रिमंडळाशिवाय सरकार

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला. मात्र, तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, यापूर्वी अन्य राज्यामध्येही बिना मंत्रिमंडळाचा कारभार चालवल्या गेला. नेमकं कोणत्या राज्यात मंत्रिमंडळाविना कारभार चालविला गेला? याच विषयी जाणून घेऊ. 


महत्वाच्या बाबी 

१. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन आता महिना उलटला 

२. मंत्रिमंडळाचा विस्तार करायला सरकारला मुहूर्त मिळेना

३. ६६ दिवसांनी चंद्रशेखर राव यांनी केला मंत्रिमंडळ विस्तार

४. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका

महाराष्ट्रातील सत्तानाट्य चांगलंच गाजले. राज्यातील सत्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. अन् राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री  शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. या महिना उलटून गेला. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. केवळ दोनच लोकांवर राज्याचा कारभार सुरु आहे. महिना उलटून गेला तरीही राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नसल्यानं विरोधकाकडून सरकारवर टीकेची झोड उठविली जातेय. खरंतर असं बिना मंत्रीमंडळाचा कारभार चालवणारे महाराष्ट्र हे देशातील काही पहिलं राज्य नाहीये. यापूर्वीही काही राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार न करताच सरकारं चालवल्या गेली. यापूर्वी तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला २०१८ मध्ये पुन्हा सत्ता मिळाली होती.. ११९ जागेपैकी तब्बल ८८ जागेवर टीआरएस पक्षाचे उमदेवार निवडून आले होते. तेव्हा चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. चंद्रशेखर राव यांच्यासोबत  मोहम्मद महमूद अली यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली होती. हा शपथविधी १३ डिसेंबर २०१८ रोजी झाला होता. तेव्हा राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री  चंद्रशेखर राव आणि मोहंमद अली हे दोनच मंत्री होते. पुढं तेलंगणा राज्य सरकारनं  मंत्रिमंडळाचा विस्तार १९ फेब्रुवारी २०१९ रोजी केला होता. तब्बल ६६ दिवसांनी हा मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. दोन महिण्यापेक्षा जास्त काळ बिना मंत्रीमंडळाचे सरकार चालवण्याचा पहिला विक्रम चंद्रशेखर राव यांच्या नावावर  आहे. तर कर्नाटकातही २५ दिवसानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता.. भाजपचे  बीएस येडियुरप्पा यांनी २०१९ मध्ये कर्नाटकात एकट्याने  चालवले होते. २६ जुलै २०१९ रोजी शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा यांनी एकट्याने आठ-दहा दिवस नाही तर जवळपास २५ दिवस कर्नाटकातील भाजप सरकार चालवले होते. अनेक प्रयत्न करूनही भाजप नेतृत्वाने त्यांना २४ दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार करू दिला नव्हता असं, तेव्हा सांगितल्या गेलं. दरम्यान, महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापन होईन ३५ दिवस झालेत. त्यामुळे आता तरी शिंदे आणि फडणवीस हे मंत्रिमंडळाचा विस्तार करतात की आणखी वेट अँड वॉचची भूमिका घेऊन चंद्रशेखर राव यांचा विक्रम मोडतात, हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!