Just another WordPress site

No one is claiming Rs 80,000 crore | देशात थोडे थोडके नाहीतर तब्बल ८० हजार कोटी रुपये बेवारस पडून

पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जी मिळविण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालतो. पैशानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात असं नाही. पैसा सर्वस्व नाही, मात्र, पैशावाचून अनेकदा अडते. त्यामुळे पैसा असला तर अनेक गोष्टी अगदी सहज साध्य होतात. या जगात हौसमौज करायची असेल तर पैसे हवेतच, असं प्रत्येकाला मनोमन वाटतं. पैसा सहज मिळवता येत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. मग मला सांगा, तुम्ही कधी लाखो रुपयांच्या पैश्याला मालक नाही, आणि तो कुठंतरी बेवारस पडलेला आहे, असं पाहिलं का? नसेल पाहिलं. मात्र देशातील अनेक बॅंका आणि म्युच्युअल फंडात एक – दोन नव्हे तर तब्बल ८० हजार कोटी रुपये बेवारस अवस्थेत पडून आहेत.

हाईलाईट्स

१. देशात ८० हजार कोटी रुपये पडून

२. नॉमिनी दिला नसल्यामुळे समस्या !

३. झीरोधाने ग्राहकांना दिली विशेष सुविधा

४. फिचरमुळे होईल बेवारस रकमेचा बंदोबस्त 


अलीकडेच, ईपीएफओने सांगितले होते की, पीएफ खात्यात सुमारे २६ हजार ४९७ कोटी रुपये जमा असून त्यावर पैशावर कोणाही दावा केलेला नाही. याशिवाय,  बँकेत अनेक मुदत ठेवी आहेत, ज्यांचे दावेदार मुदतपूर्तीनंतरही आलेले नाहीत. अशाप्रकारे, एकूण ८० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पडून आहे. या रकमेवर दावा करण्यासाठी कोणाही दावेदार पुढे आलेला नसल्यानं ही रक्कम दरवर्षी वाढतच आहे. महत्वाचं म्हणजे, ही रक्कम काही कोण्या एका व्यक्तीची वा संस्थेची नसून, आपल्यापैकी लाखो लोकांची आहे. हा पडून असलेला बेवारस पैसा काही काळी पैसा नाही, ना चोरीचा कमाई आहे. मात्र, त्यावर कोणी दावा करीत नसल्याने तो वित्तीय संस्थांत पडून आहे. पैशांवाचून बऱ्याचदा अडते, हे माहीत असूनही अनेक जण आपल्या आर्थिक अज्ञानामुळे, नाहीतर बेपर्वा वृत्तीमुळे या आपल्याच  पैशांवर पाणी सोडतात. आपल्या याच वृत्तीमुळे देशातील बँकांतील अनेक खाती, डीमॅट आणि म्युच्युअल फंड यांच्यात तब्बल ८० हजार कोटी रुपये पडून आहेत. आता झीरोधा या ब्रोकिंग फर्मच्या सहसंस्थापकांनी या समस्येवर उपाय सांगितला आहे. त्यांचे म्हणणं आहे की, अनेक लोकांनी नॉमिनी दिला नसल्याने बँक, डिमॅट आणि इतर खात्यांमध्ये 80 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून आहे. ही समस्या पाहता, झिरोधाने एक अलर्ट फीचर सुरू केलेय. जे डिमॅट खाते सक्रिय नसल्यास नामांकित व्यक्तीला कळवेल. झिरोधा कंपनीने आशा व्यक्त केली की, लवकरच बँका आणि इतर ऑनलाईन ब्रोकरेज कंपन्या देखील हे फीचर स्वीकारतील. जेणेकरून वारस नसलेल्या रकमेला वारसदार मिळेल. वास्तविक, झिरोधाने आपल्या ग्राहकांना एक विशेष सुविधा दिली आहे की ज्या अंतर्गत खातेधारक त्यांच्या खात्यात ऑनलाईन वारसदार जोडू किंवा बदलू शकतात. एवढेच नाही तर जर एक वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यामुळे डिमॅट खाते सक्रिय नसेल तर त्याची माहिती नामनिर्देशित व्यक्तीला एसएमएस किंवा ईमेल द्वारे दिली जाईल.  यामुळे विना क्लेमवाल्या रकमेचा बंदोबस्त करता येईल. दरम्यान, बेवारस पडून असलेल्या या ८० हजार कोटी रुपयांना आता या रकमेचे वारसदार भेटतात की, रकम सरकारी तिजोरीत जमा होणार? हेचं पाहावं लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!