Just another WordPress site

पुढील वर्षी कार्तिकी आणि आषाढी एकदशीला विठ्ठलाची महापूजा अजित दादाच करणार – मिटकरी

शिर्डी : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे यांनी भाजपसोबत जावून मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं. आता त्यांचं सरकार लवकरच कोसळणार, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुढील वर्षीच्या कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या महापूजेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, पुढील वर्षीच्या कार्तिकी आणि आषाढी एकदशीला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करेल, असंही मिटकरी म्हणाले. मिटकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अमोल मिटकरी शिर्डी येथे मंथन शिबीरात बोलत होते.

मिटकरी पुढं म्हणाले की, आज कार्तिक एकादशी आहे. एक वारकरी म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. आज मी शिर्डीमध्ये आहे. याठिकाणी आमचं मंथन शिबीर सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या मनात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल प्रचंड रोष असल्याचा दावाही मिटकरी यांनी केला.

आज कार्तिकी एकादशी असून पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठ्ठलाची महापूजा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!