Just another WordPress site

Murder । पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबार, अकरावीत शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या, शहर हादरलं


पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये  गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. महिन्याभरात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घराबाहेर गेलेला अल्पवयीन तरुण रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यावेळी एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात त्याचा मृतदेह सापडला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही हादरवणारी घटना घडली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री १२.३० वाजता गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. इयत्ता ११ वी मध्ये शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मृतक मुलाचे नाव दशांत  आहे.  संबधित विद्यार्थी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास आपल्या घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. विद्यार्थ्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह हा पोलीस ठाण्याजवळील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात आढळला. त्याच्या डोक्यात गोळी लागलेली होती.  पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.  दरम्यान, विद्यार्थ्याचा कोणाशी कसलाही वाद नव्हता, अशी कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र ही हत्या का झाली आणि कोणी केली हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  दरम्यान,  या हत्ये प्रकरणी तळेगांव दाभाडे पोलीसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!