Just another WordPress site

Murder । ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिंडोरीमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; घटनेने शहर हादरलं

नाशिक : नाशिकमध्ये हत्या सत्र काही थांबताना दिसत नाही. आता पुन्हा एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून  निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं.  या अमानुष घटनेने संपूर्ण दिंडोरी तालुका  हादरला असून  परिसरात एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील दिपक जनार्दन जाधव या २२ वर्षीय युवकाची काल रात्रीच्या  सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. दीपक याचा खून करत अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा मृतदेह सार्वजनिक वाचनालयाजवळील बाभळीच्या झाडाजवळील झुडपांमध्ये टाकून दिला. या घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील रोशन परदेशी यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन दिपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दिपकची दगडाने ठेचून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली.  मात्र,  हे कृत्य कुणी केलं आणि हत्येमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि पोलिस कर्मचारी घटनेचा पुढील तपास करत आहेेेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!