Just another WordPress site

Mi-17V-5 Helicaptor । भारतीय लष्कारात वापरात असलेल्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरच्या वैशिष्ट्ये आणि क्षमतांविषयी घ्या जाणून

तामिळनाडूतील  कुन्नूर येथे काल भारतीय लष्कराचे  MI-17V-5  हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह तेरा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या MI-17V-5 या   हेलिकॉप्टरची खासियत काय आहे? भारताने ते कधी विकत घेतले आणि ते जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर का आहे? याच विषयी जाणून घेऊया.जगातील कोणतेही संरक्षण दलाला सध्याच्या काळात हेलिकॉप्टर शिवाय कल्पनाच करता येणार नाही. कोणत्याही वातावरणात संचार करणे, २० किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करणे, लष्कराच्या जवानांची, लष्करी साहित्याची वाहतुक करणे, कोणत्याही ठिकाणी उतरणे, हवेत स्थिर रहाणे अशी विविध क्षमता असलेली बहुउद्देशीय हेलिकॉप्टर जगात अनेक संरक्षण दलांकडे आहेत. त्यातीलच एक आहे  MI-17V-5.


MI-17V-5 हेलिकॉप्टर तयार कोणी केले?

MI-17V-5 हे दुहेरी इंजिन हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान हे पुर्णपण सोव्हिएत रशियाचे होते. हे हेलिकॉप्टर Mikhail Mil या रशियन अभियंत्याने १९५० दशकांत हेलिकॉप्टरची तयार केले. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने Mikhail Mil यांच्या नावातील सुरूवातीच्या अक्षरावरुन हेलिकॉप्टरला Mi हे दिलं. या नावावरुन अनेक हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली. तर याच श्रेणीतले Mi-17V-5  हेलिकॉप्टर हे १९७७ साली रशियाच्या संरक्षण दलात दाखल झाले.  Mi-17V-5 हेलिकॉप्टर हे Mi-8 हेलिकॉप्टरची अपग्रेडेड व्हर्जन आहे.

भारतात कधीपासून होतो वापर? 

सध्या देशाच्या संरक्षण दलाकडे विविध हेलिकॉप्टर असून त्यापैकी Mi-17V-5  हेलिकॉप्टर हा संरक्षण दलाचा कणा आहे. भारताने डिसेंबर, २००८ मध्ये ८० एमआय हेलिकॉप्टर्सची ऑर्डर रशियाला दिली होती. त्यासाठी  १.३ अब्ज किमतीचा करार केला.  भारतीय हवाई दलाला Mi हेलिकॉप्टरची डिलिव्हरी 2011 मध्ये सुरू झाली आणि 2013 मध्ये 36 Mi सीरीज हेलिकॉप्टर प्राप्त झाले. २०१२-२०१३ दरम्यान ७१ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली गेली. त्यानंतर जुलै, २०१८ मध्ये पाच हेलिकॉप्टर्स भारतात दाखल झाले.


Mi-17V-5 हेलिकॉप्टर किती सक्षम?

Mi-17V-5 ही Mi-8 हे जास्त उंचीवर आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातही चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने अपग्रेड केलेले व्हर्जन आहे. Mi-17V-5 विशेषत: उंचीवर आणि उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले गेले. एकाच वेळी २४ पेक्षा जास्त लोकांना नेण्याची किंवा ४ टन वजनाचे लष्करी साहित्य वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. जास्तीत जास्त २८० किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेत संचार करण्याची तर एका दमात जास्तीत जास्त ८०० किलोमीटर अंतर पार करण्याची Mi-17 हेलिकॉप्टरची क्षमता आहे… महत्वाचं म्हणजे, कुठेही लँडिंग करण्याची क्षमता या हेलिकॉप्टरची आहे.


व्हिआयपी ते सैन्यदलासाठी केला जातो वापर 

Mi-17V-5 हे जगातील सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर आहे. हे सैन्य आणि शस्त्रे वाहतूक, फायर सपोर्ट, गार्ड पेट्रोल आणि शोध आणि बचाव मोहिमांमध्ये देखील तैनात केले जाऊ शकते.  तसंच संरक्षण दलातील जवानांची, लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी, विविध लष्करी कारवाईंसाठी याच Mi-17V-5 चा वापर होतो.  एवढचं नाही तर देशातील अति महत्त्वाच्या म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी ही Mi-17V-5 वर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकदा देशांतर्गत प्रवासासाठी याच हेलिकॉप्टरचा वापर करतात.


Mi-17V-5 हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये काय? 

१. Mi-17V-5 हे एक मध्यम ट्विन टर्बाइन हेलिकॉप्टर आहे. 

२. हे हेलिकॉप्टर ३६  हजार किलोपर्यंतचा भार उचलू शकते. 

३. क्रू मेंबर्ससह ३६ जण या हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतात. 

४. व्हीव्हीआयपींसाठी तयार करण्यात आलेले विशेष हेलिकॉप्टर २० जणांना घेऊन जाऊ शकते. 

५. व्हीपीआयपीच्या सुधारित हेलिकॉप्टरमध्येही शौचालय आहे.

लष्करापासून नागरी वापराकरता या हेलिकॉप्टरचा वापर करणे शक्य असल्याने जगात हे हेलिकॉप्टर लोकप्रिय आहे. म्हणूनच सध्या जगातील ६० पेक्षा जास्त देशांकडे Mi-17V-5 हे हेलिकॉप्टर कार्यरत आहे.


हेही वाचा : बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशी पथकाचे प्रमुख मानवेंद्र सिंग आहेत तरी कोण?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!