Just another WordPress site

Letter of threat to Vikram Rathore of Yuvasena | अनिल राठोड यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र, शहरात एकच खळबळ

अहमदनगर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना धमकीचे पत्र आल्याची घटना ताजी असतांनाच आता  युवा सेनेच प्रमुख जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनाही एका अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शहरात एकच  खळबळ उडाली असून  शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरात २५ वर्षे शिवसेनेचे आमदार राहिलेले शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांचे पूत्र  विक्रम राठोड यांना अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी  दिली. या धमकी प्रकरणी विक्रम राठोड यांनी अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विक्रम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, अज्ञात व्यक्तीने पोस्टाद्वारे शिवसेनेच्या चितळे रस्त्यावरील कार्यालयात निनावी पत्र पाठवलेय. या पत्रात जीवे धमकी देण्यात आली. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, कारण तुझ्या बापाने नगरचा कधीच विकास केला नाही. तू तरी काय करणार? असा सवाल केलाय. सोबतच शिवसेना कार्यकर्ते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले.

शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने त्यांना पोलिस संरक्षण दिले होते. दरम्यान,  विक्रमराठोड यांनी धमकीचे पत्र मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चितळे रस्त्यावरील शिवसेना कार्यालयात एकच गर्दी केली होती.  धमकी प्रकरणी तोफखाना पोलिसांनी कलम ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला. शहरातील नेत्यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र सुरू झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी असे पत्र पाठवणाऱ्यांचा शोध घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होते. दरम्यान, घटनेचा  पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करताहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!