Just another WordPress site

Leena Nair । कोल्हापुरच्या लीना नायर बनल्या फ्रान्सच्या शनैल कंपनीच्या सीईओ; कसा आहे त्यांचा इथवरचा प्रवास?

काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्याकडे ट्विटरची कमान सोपविण्यात आली, त्यामुळे जगभरात भारताची मान आणखी उंचावली गेली. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या लीना नायर यांची लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनैलच्या ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती झाली. दरम्यान,  लीना नायर आहेत तरी कोण? त्यांचा  शनैल कंपनीच्या  ग्लोबल सीईओ पदापर्यंतचा आजवरचा प्रवास कसा होता?  याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.



हायलाईट्स

१. मराठमोळ्या लीना नायर यांचा जगात डंका

२. नायर बनल्या Chanel कंपनीच्या सीईओ 

३. लीना नायर यांचा जन्म कोल्हापूरचा 

४. लीना युनिलीवरमध्ये राहिल्या आहेत CHRO


शनैल ही प्रसिद्ध अशी फॅशन कंपनी आहे.  याआधी लीना नायर या युनिलवरसोबत काम करत होत्या. विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या असलेल्या लीना नायर यांचे महाराष्ट्रातील कोल्हापूरशी कनेक्शन आहे. लंडनमध्ये डंका वाजवणाऱ्या लीना नायर यांचा जन्म ११ जुन १९६९ मध्ये कोल्हापुरात झाला. त्यांनी आपले शालेश शिक्षण कोल्हापूर येथील होली क्रॉस शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणासाठी त्या जमशेदपूरला गेल्या. तिथे झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. एमबीएमध्ये त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या. १९९२ मध्ये लीना नायर यांनी युनिलिव्हरमध्ये काम सुरु केलं होतं. त्यांनी कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करत करत २०१६ मध्ये प्रमुख एचआर अधिकारी पदापर्यंत मजल मारली होती. याच काळात हिंदुस्थान लिव्हरने नाव बदलून युनिलिव्हर केले. लीना या युनिलिव्हरमध्ये सर्वात कमी वयाची आणि पहिली महिला, पहिली आशियाई chief human resources officer  ठरल्या होत्या. लीना यांनी युनिलिव्हरमध्ये तब्बल ३० वर्षांची सेवा दिली. लीना नायर यांचा गेल्या महिन्यात फॉर्च्यून इंडियाने सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता. दरम्यान, आता लीना या फ्रान्सच्या दिग्गज कंपनीच्या CEO झाल्यानंतर जगात भारतीयांचा डंका वाजला. कंपनीच्या सीईओ पदी नियुक्तीनंतर लीना नायर यांनी ट्विटरवर आभार मानले. येणाऱ्या जानेवारीमध्ये  त्या शनैल कंपनीत  रुजू होणार आहेत. शनैल कंपनी त्यांच्या क्विल्टेड हँडबॅग, ट्विड सूट आणि no.5 परफ्युम या उत्पादनांसाठी ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या कार्याचा अनुभव पाहूनच त्यांना या नव्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!