Just another WordPress site

Laxmikant Parsekar : भाजपला धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपला रामराम


पणजी : गोव्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाला रामराम करण्याची घोषणा आज केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. यामुळे पार्सेकर भाजपवर नाराज आहेत. ‘आज संध्याकाळपर्यंत औपचारिकपणे राजीनामा सादर करेन’, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. पार्सेकर हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. ते भाजपच्या कोअर कमिटीचेही सदस्य आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर पार्सेकर हे २०१४ ते २०१७ या काळात मुख्यमंत्री होते. ते पर्रीकरांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जात.  दरम्यान, भाजपने दोन दिवसांपूर्वीच म्हणजे गुरुवारी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव नाही. यामुळे नाराज पार्सेकर भाजपला आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवतली, अशी शक्यता आहे. भाजपने मंड्रेम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे. सोपटे यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सोपटे यांनी पार्सेकर यांचा पराभव केला होता. पण नंतर २०१९ मध्ये सोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पार्सेकरांना डावलून भाजपने सोपटेंना संधी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या पार्सेकरांनी थेट पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!