Just another WordPress site

JNU Dance । जेएनयू पुन्हा चर्चेत! जेएनयूचा सिक्युरिटी गार्ड झाला ‘या’ कारनाम्यानं झाला व्हायरल


जेएनयू कायम कुठल्यातरी विवादास्पद कारणांसाठी चर्चेत असते. आताही जेएनयू पुन्हा चर्चेत आलं. मात्र, आता जेएनयू चर्चेत येण्याचं कारण जरा हटके आहे. जेएनयूच्या  सिक्युरिटी गार्डचा ‘ज्युली’ गाण्यावर थिरकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर कुणाकडे टॅलेंट असेल तर तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो, त्याचं टॅलेंट वाया जात नाही. अनेकजण असे आहेत, ज्यांना सोशल मीडियाने एका रात्रीत स्टार बनवलं. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. यातील काही व्हिडीओ तर अतिशय मजेदार असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे प्राणी, पक्षी तर काही व्हिडीओ हे माणसांच्या करामतीचे असतात. सध्या सोशल मीडियावर जेएनयुच्या सिक्युरिटी गार्डच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागला. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ चांगलाच आवडा असून यातील डान्स मुव्स बघून सोशल मीडिया यूजर्स गार्डचे कौतूक करत आहेत. 

पहा :

The Art of an artist never dies!!!!….
Dance of JNU security guard ji🔥🔥…. #artist #JNU @JNU_Photos @ndtv @ScoopWhoop @TheLallantop pic.twitter.com/fUrrzYMCZl

— JNU ROUND TABLE (@Jnuroundtable) December 7, 2021

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!