Just another WordPress site

In Bhiwandi, the husband stabbed his wife | भिवंडीत पतीने पत्नीला भोकसले


भिवंडी : भिवंडीमधून हत्येची एक थरारक घटना समोर आली. गैरसमाजातून एका पतीने आपल्या पत्नीची पत्नीवर चाकूने सपासप वार केले.  हा चाकु हल्ला इतका भयंकर होता की, या हल्यात महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान,  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक चांगलेच हादरून गेलेत. कुरेशा इरफान शेख असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव आहे. तर इरफान रफिक शेख असं आरोपी पतीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  इरफान शेख हा आपली पत्नी कुरेशा यांच्यासोबत भोईवाडा येथील कारीवली गावच्या चाळीत राहातो. त्याला दारूचं व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो किरकोळ कारणातून नेहमी आपल्या पत्नीसोबत वाद उकरून काढायचा. घटनेच्या दिवशीही आरोपी इरफान  दारू पिऊन आला आणि पत्नीसोबत वाद घालत शिवीगाळ करू लागला. तसंच तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला असून, त्यामुळेच तू मला त्रास देते, असा आरोपही पतीने यावेळी केला होता. यामुळं पती-पत्नीत कडाक्याचं भांडण झालं. हाच राग मनात धरून आरोपी पतीने पत्नीला ठोशाबुक्यांनी मारहाण केली. मारहाण होत असतांना पत्नी कुरेशा यांनी आरोपीचा हात धरला. हात धरल्याने इरफानला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने घरात भाजी कापण्यासाठी ठेवलेल्या चाकूने आपल्या पत्नीवर सपासप वार केले. या चाकु हल्यात  पत्नी कुरेशा या गंभीर जखमी झाल्यायेत. तर पत्नी घरात गंभीर जखमी  अवस्थेत पडल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. कुरेशा यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर  उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात आरोपी पती इरफान शेख यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आपरोपीचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!