Just another WordPress site

सावधान! बर्फ गोला अनेक आजारांना ठरतोय कारणीभूत; साखरीन मिश्रित रंग आरोग्यासाठी घातक

नगर : तापत्या उन्हात लोकांना रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाडीवरचा बर्फ गोला (Ice Gola) खाण्याचा मोह आवरत नाही. उन्हाचा पारा चढत असल्याने फळांचा रस, लिंबू सरबतच्या (Lemon syrup) गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. बर्फ गोला व सरबतासाठी वापरण्यात येणारे रंग कोणत्या दर्जाचे असतात, यावर आरोग्याचा प्रश्न अवलंबून आहे. रंगही दर्जाहीन आणि पाणीही अशुद्ध असल्याने गॅस्ट्रो आणि कावीळच्या साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. काला खट्टा, ऑरेंज, रेड, चॉकलेटी, हिरवा, पिवळ्या रंगाच्या आकर्षक दिसणाऱ्या या बाटलीतील साखरीन मिश्रित रंग आरोग्यासाठी (Health) घातक ठरत आहे. (Ice Gola hazardous health)

मुलाला शाळेत नेणाऱ्या बसमध्ये ‘एफएपीएस’ यंत्रणा आहे का? 

रस्त्यावर, रेल्वेस्थानक परिसर आणि बसस्थानक परिसर, मुख्य चौक तसेच कॉलनीतील गल्लोगल्ली हे बर्फाचे गोले विकणाऱ्यांची दिवसभर ये-जा सुरूच असते. बच्चे कंपनी बर्फ गोला खाण्यासाठी हट्ट करतात. काही जण कौतुकाने मुलांना हे गोले खायला देतात. गोल्यातील रंग बघून अनेकांना बर्फाचा गोळा खाण्याची इच्छा होते. मात्र हा बर्फाचा गोलाच अनेक आजाराला कारणीभूत ठरत आहे. उन्हाळ्यात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून काही गरीब व होतकरू विक्रेत्यांनी बर्फ गोला व्यवसाय सुरू केला असेल. काहींचे घरच या सरबतच्या गाड्या आणि बर्फाच्या गोल्यावर चालतही असेल. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर सावधानता बाळगणे गरजेचे ठरत आहे.

एनसीसीएफ आणि नाफेड करणार कांदा खरेदी, दर कोसळू नयेत यासाठी सरकारचा निर्णय  

अनेकांना शुद्ध पाणी परवडत नसल्याने, ‘मिळेल त्या पाण्याचे’ सरबत बनविण्याचा हा पर्याय अनेकांनी निवडलाही असेल. हा पर्याय मात्र सरबत पिणाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवत आहे. जिल्हाभरात ५०० च्या जवळपास बर्फ गोले विक्रेता असून त्यापैकी किती जण स्वच्छतेकडे लक्ष देतात याचा अंदाज घेणे अवघड आहे. त्यामुळे बर्फ गोला खाण्याआधी नागरिकांनी बर्फ कोठे तयार होतो, त्यासाठी कुठले पाणी वापरतात याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

असा बनतो बर्फ गोळा, सरबत
गाड्यावरील सरबत बहुतांशी अस्वच्छतेच्या वातावरणात बनविले जाते. ते बनविताना स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते की नाही, हा प्रश्न अनुत्तरीय आहे. अनेक वेळा दुषित पाणी, निकृष्ट दर्जाच्या रंगांचाही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोळा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ बारदान्यात गुंडाळून ठेवण्यात येतो. बर्फ बनविण्यात येणारे कारखान्यातही विशेष अशी काळजी घेतली जात नाही. बर्फ बनविण्यासाठी कारखान्यात मोठमोठे फ्रिजर असतात मात्र त्या फ्रिजरच्यावर लाकडी पाट्या ठेवण्यात येतात. व त्यावरुनच कारखान्यातील कामगार ये-जा करताना दिसून येतात. त्यामुळे कामगाराच्या पायांची धुळ अथवा घाण बर्फात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडेही संबंधितांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

आजाराला निमंत्रण
तापाच्या रुग्णापेक्षा सध्या गॅस्ट्रो आणि कावीळचे रुग्ण असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. यात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. दुषित पाण्याबरोबर उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याच्या सवयीमुळे आजारात वाढ झाली आहे. बर्फ हा थंड जरी असला तरी तो गरम असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते त्यामुळे बर्फामुळे उन्हाळी लागण्याची शक्यता असते.

बर्फ बनविण्यासाठी ० डिग्रीच्या तापमानाची
आवश्यकता असते. त्याशिवाय बर्फ बनु शकत नाही. त्यामुळे बर्फ हा थंड पदार्थामध्ये गणल्या जाते. मात्र वैज्ञानिक दृष्ट्या बर्फ हा पदार्थ शरीरासाठी गरम आहे. लहान मुलांना बर्फाचा गोळा देताना पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. श्रेया शिंदे, नगर

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!