Just another WordPress site

Hearing on Karuna Sharma’s bail application adjourned | करुणा शर्मा न्यायलयीन कोठडीतच राहणार; जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी होणार

बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी बीडमधील अंबाजोगाई कोर्टाने सुनावली होती. आता अंबाजोगाई सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्याने करूणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढलाय. न्यायाधीश सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला असून आता येत्या सोमवारी म्हणजे २० सप्टेंबरला जामीनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे अजून दोन दिवस तरी त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा  परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.. न्यायालयीन कोठडीत असलेल्या करूणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात न्यायधीश सापटनेकर यांच्यासमोर करूणा शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली.  यावेळी दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!