Just another WordPress site

HEADLINE । 20 बातम्यांचा वेगवान आढावा

 १.  जो कहता था गंगा ने बुलाया है… उसने माँ गंगा को रुलाया है… उत्तप्रदेशातल्या मृतदेहांच्या घटनेनंतर राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींना टोला.


२. पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन… लॉकडाऊनमध्ये मेट्रो-बस सेवाही स्थगित राहणार.


३. गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नायजेरियाचे… कंगना रनौतचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान.


४. माशा मारण्याचा अर्थ मलिक यांना ठावूक नसावा… मलिकांना भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर.


५. पनवेलमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई… परिमंडळ २ मध्ये ३५ हजार नागरिकांवर कारवाई.


६. राज्य सरकारला आपले असलेले अधिकार गमवायचेत… मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समरजितसिंह घाटगे यांची टीका.


७. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन… असीम बॅनर्जी यांचं कोरोनामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


८. ‘DRDO’ चं अँटी-कोविड औषध ‘2-DG’ होणार लाँच… पुढील आठवड्यात मिळणार औषधाचे १० हजार डोस.


९. केरळमधील 5 जिल्ह्यात ‘तौत्के’मुळे रेड अलर्ट… कोकण किनारपट्टीला  प्रशासनाचा सावधानतेचा इशारा.


१०. मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर… चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय.


११. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची मागणी.


१२. जूनमध्ये कमी, जुलै महिन्यात चांगला, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस… भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर.


१३. नवी मुंबई महानगरपालिका काढणार लसीचे ग्लोबल टेंडर… मनपा काढणार 4 लाख लसींचे ग्लोबल टेंडर.


१४. गुजरातमधून येणाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असला तरच महाराष्ट्रात प्रवेश… नंदुरबारच्या बेडकीत पोलिसांकडून तपासणी.


१५. बीडमधील मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा रद्द… आमदार विनायक मेटे यांची माहिती.


१६. हिंगोलीत मोबाईल चोराला अटक करण्यावरुन पोलिस स्टेशनवर दगडफेक… जमावाला पांगवण्यासाठी पोलिस निरीक्षकांकडून फायरिंग.


१७. नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरावर पोहोचली कुवैतची मदत… कुवेत येथून ऑक्सिजनचे 9 टँकर जेएनपीटी बंदरावर दाखल.


१८. राज्याच्या मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची मागणी.


१९. काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली… पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू.


२०. हिंगोलीत मराठा आरक्षणाबाबत निषेध आंदोलन… मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे, शरद पवारांसह अशोक चव्हाण यांच्या प्रतिमेला मारले जोडे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!