Just another WordPress site

HEADLINE । 20 बातम्यांचा वेगवान आढावा

१. देशाच्या ४८ व्या सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रमणा… राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ… माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केली होती रमणा यांची शिफारस.


२. देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते… पण त्यांनी उतावीळ होऊन चुकीची पावलं टाकली, माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरोंनी टोचले फडणवीसांचे कान.


३. अनिल देशमुखांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक संतप्त… कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते का? मलिकांचा सीबीआयला सवाल.


४. अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयचे छापे…. एफआयआरही दाखल….  दया, कुछ तो गडबड है… संजय राऊतांनी उठवलं शंकेचं मोहोळ… धाडसत्रावर शंका उपस्थित करतांना राऊतांचं भाजपकडं बोट.


५. अनिल देशमुखांवर कारवाई ही सोची समझी चाल… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांची टीका… लवकरच होईल, दूध का दूध आणि पानी का पानी…


६. काही जण सुपात तर काही जण जात्यात…. चंद्रकांत पाटील यांची सुचक प्रतिक्रिया… अनिल परबांचीही सीबीआय चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटलांची मागणी.


७. आता वाहनांवर लाल पिवळी, हिरवे स्टीकर लावणं बंधनकारक नाही… मुंबईतील गाड्यांसाठीची कलर कोड सिस्टम सात दिवसातच गुंडाळली.


८. ऑक्सीजन नाहीयेत म्हणून लोक मरताहेत… जबाबदारीचं भान बाळगा… सुप्रीम कोर्टाचे केंद्रावर पुन्हा एकदा ताशेरे… ऑक्सीजन पुरवठ्यासाठी काय केल? कोर्टाचा सरकारला सवाल.


९. मुंबई महापालिका आता हवेतून मिळवणार ऑक्सीजन… पालिकेच्या १२ हॉस्पिटलमध्ये १६ ठिकाणी उभारणार प्रकल्प… दिवसाला ४३ टन ऑक्सीजनची होणार निर्मीती.


१०. यवतमाळमध्ये तळीरामांची जीवघेणी कमाल… दारू मिळत नसल्यानं प्यायले चक्क सॅनिटायझर… सहा जणांचा झाला मृत्यू.


११. सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम… नगरकरांकरीता दिल्लीवरून खाजगी विमानानं आणली १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन.


१२. नवी दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २० कोरोनाबाधितांचा मृत्यू… जयपूर गोल्डन रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश.


१३. उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहाकार… आठ जणांचा मृत्यू…  तर ४३० लोकांना काढलं सुखरुप बाहेर… अजूनही शेकडो जण अडकल्याची भीती.


१४. अमित ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज… कोरोनाची लक्षणे कमी झाल्यानं दिली रुग्णालायातून सुटी… मात्र अमित ठाकरेंना विलगीकरणात रहावं  लागणार.


१५. अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड प्रकरणी राष्ट्रवादीकडून जोरदार टीका… राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच धाडींचा वापर… जयंत पाटलांकडून धाडसत्राचा निषेध.


१६. जामनेरचे आमदार दाखवा दहा लाख मिळवा… राष्ट्रवादीकडून जळगाव पालिका चौकात अनोखं आंदोलन… गिरीश महाजनांवर सोडलं टीकास्त्र.


१७. ‘अच्छे दिन दूरच, पण नरक तो हाच काय?’; शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर सडकून टीका.


१८. खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लागण… स्वतः फेसबुक पोस्ट करत दिली माहिती… सौम्य लक्षणं आढळल्यानं केली होती कोरोना चाचणी.


१९. पाकिस्तानला मोफत लस पुरवता मग देशाला का नाही? काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप.


२०. राज्यात अवकाळी पावसाचं सावट कायम… येत्या ५ दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊसाचा इशारा… मुंबई हवामान विभागानं दिली माहिती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!