Just another WordPress site

HEADLINE । 20 बातम्यांचा वेगवान आढावा

 १. ‘बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला…’ मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावरून अतुल भातखळकरांची शरद पवारांवर टीका.


२. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्यावर आग… आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती.


३. ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावीच दुर्देवी मृत्यू… डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत कोरोनानं निधन.


४. महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन वापरु द्या… कोविन अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र.


५. महाराष्ट्र कोरोनाविरोधातील चांगली लढाई लढतोय… पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची फोनवरुन चर्चा… पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईचं कौतुक.


६. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पंढरपुरात सकल मराठा समाजाची बैठक… अभ्यास करुन पुढील दिशा ठरवणार असल्याची आमदार समाधान आवताडे यांची माहिती.


७. केवळ भाषण, घोषणा करणं हा मोदींचा कार्यक्रम… देशातील लसीकरणाचा कार्यक्रम मात्र ठप्प… मंत्री नवाब मलिक यांचा मोदींना टोला.


८. सोलापूर कडक लॉकडाऊनमध्ये अंशतः बदल… ११ आणि १२ तारखेला कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता… ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय.


९. देशातला १६ मे पर्यंतचा रेमडेसिवीरचा कोटा जाहीर… महाराष्ट्राला मिळणार ११. ५० लाख रेमडेसिवीर…  देशात १६ मे पर्यंत ५३ लाख लसींचं वाटप.


१०. नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न… जीएसटी वसुलीवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका.


११. स्मशानभूमीत सतत जळणाऱ्या चितांमुळे दिल्लीकरांना त्रास… राहती घरं सोडून अनेक जणांचं स्थलांतर.


१२ अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण… स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती.


१३. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय धोरणात मोठे बदल… ओळखपत्र, RT-PCR रिपोर्ट नसला तरी रुग्णांना दाखल करुन घ्यावं लागणार.


१४. बाजार समित्या बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार… नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे बैठकीत संकेत.


१५. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी आणि हतबल… राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पंतप्रधान मोदींवर टीका.


१६. चंद्रपुरात रेमडेसिवीरच्या रॅकेटमध्ये डॉक्टर, नर्सेसचा समावेश… आतापर्यंत डॉक्टरसह ५ जणांना अटक.


१७. हे लोक अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेऊ शकतात, तर माझी हत्या फार छोटी गोष्ट… व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा खळबळजनक आरोप.


१८. द्रमुकनं सत्तेत येताच बदलली ९ मंत्रालयांची नावं… तामिळनाडूत आनिवासी भारतीय नव्हे तर आता अनिवासी तामिळ विभाग असणार.


१९. उजनीच्या पाण्यावरुन प्रणिती शिंदे आक्रमक… काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता.


२०. राज्यात ढगांच्या गडगडाटासह पुढील चार दिवस पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता… भारतीय हवामान विभागानं वर्तवला अंदाज.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!