Just another WordPress site

Goa Election : गोव्यात बंपर मतदान, सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले, पाहा गोव्यात कुणाची असेल सत्ता?

गोवा विधानसभा निवडणुकीच्या सर्व ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात होते. या जागांसाठी काल मतदान प्रक्रिया काल पार पडली असून उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालं. आरामदायक आणि शांतता प्रिय जीवन जगण्याऱ्या गोवेकरांनी यंदा घरातून बाहेर पडत विक्रमी मतदानांची नोंद केली. गोव्यात ७८.९४ टक्के मतदानांची नोंद झालीये. दरम्यान, गोव्यातील बंपर मतदान नेमके कोणाच्या बाजून झाले? यावरून आता अनेक तर्क लावले जाऊ लागले. शिवाय, बंपर मतदानामुळं प्रस्तापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.


हायलाईट्स 

१. गोवा विधानसभेसाठी ७८.९४ टक्के मतदान

२. अनेक दिग्गजांचे भवितव्य लागलेय पणाला

३. बंपर मतदानाने सर्वच राजकीय पक्ष चिंतेत

४. सीएम प्रमोद सावंत यांना विजयाचा विश्वास

गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी काल मतदान झालं.  व्हॅलेंटाईन डे असतानाही गोवेकरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केलं. पहाटे ६ वाजेपासूनच गोवेकरांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी केली होती. आश्चर्य म्हणजे दुपारी १२ वाजताच ५५ टक्के गोवेकरांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारच्या वेळीही मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. तर दिवसाच्या शेवटी गोव्यात ७८.९४ टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक ८९.६४ टक्के इतके मतदान उत्तर गोव्यातील साखळी मतदारसंघात झाले.  उत्तर गोव्यात ७९ टक्के तर दक्षिण गोव्यात ७८ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. दिवसभरात मतदारांनी दाखवलेला उत्साह पाहता यंदा गोवा राज्यात ८५ ते ९० टक्क्यांच्या पुढे मतदान होईल असं बोललं जात होतं. मात्र, २०१७ विधानसभा निवडणूकीची मतदान टक्केवारी ८१.२१ आहे. याची तुलना केली तर जवळपास ३ टक्के मतदारांनी यावेळेस मतदानच केले नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसं पहायला गेलं तर ४ ते ७ टक्के नवीन तरुण मतदारांमुळे मतदानाची आकडेवारी वाढेल असं बोललं जात होतं. मात्र तसंही होताना दिसलं नाही. तरी कोरोना स्थिती लक्षात घेता अपेक्षेपेक्षा चांगले मतदान झाल्याचं बोलल्या जातं. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात मात्र यंदा विक्रमी मतदान झालंय. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ८९.६४ टक्के मतदान मुख्यमंत्री सावंत यांच्या साकलेम मतदार संघात झालं. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत हे मतदान फारच जास्त आहे. बंपर मतदानामुळं प्रस्तापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. हे वाढीव मतदान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना नुकसानदायक ठरते की फायदेशीर हे लवकरच स्पष्ट होईल. एवढं मात्र, खरय की, बंपर मतदानामुळे  मुख्यमंत्री सावंत यांच्या बरोबरच  माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई अशा दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली. तर नव्यानेच निवडणूक लढवणाऱ्या  उत्पल पर्रीकर आणि AAP चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. निवडणुकी दरम्यान मतदारांना आकर्षित करण्याकरता अनेक राजकीय पक्षांनी वाटण्याकरता आणलेले तब्बल ६ कोटी ६० हजार ५८ हजार रोख रक्कम निवडणूक आयोगाने जप्त केली. शिवाय ४ कोटी रुपयांचे मद्य, सव्वा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ असा एकूण १२ कोटी ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल निवडणूक आयोगाने जप्त केला. याचाही  फायदा भाजपाला होतो की विरोधी पक्षांना हे निवडणूकांचे निकालच सांगतिल. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी बंपर मतदान झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली. निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज गोव्यातील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.  यामुळे निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी मुख्य सामना हा काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार असल्याची चिन्हं आहेत. यामुळे राजकीय पक्ष निवडणूक निकालानंतर युती आणि आघाडीची तयारी करू शकतात, असं बोललं जातंय. त्यामुळे या सत्ता स्थापनेसाठी बेरजेची गणितं करतांना कोण कुणाला वरचढ ठरतं आणि सत्ता काबीज करतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!