Just another WordPress site

GDS । देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख कोण?; जनरल एम एम नरवणे यांचे नाव सर्वात आघाडीवर

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्‍स स्‍टाफ जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती निधन झाले. त्‍यांच्‍या अकाली निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्‍का बसला. दरम्यान, रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे संरक्षण दल हे पद रिक्त झालेय. हे पद अधिक काळ रिक्त न ठेवता तातडीने त्यासाठीची प्रक्रिया सुरू करून लवकरच देशाला नवा संरक्षण दल प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, रावत यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड होणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं. 


हायलाईट्स

१. नवे संरक्षण दल प्रमुख नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली

२. संरक्षण दल प्रमुखपदी पुढील काही दिवसांत होणार निर्णय

३. जनरल एम एम नरवणे यांचे नाव सर्वात आघाडीवर

४. आर. हरी कुमार आणि व्ही. आर. चौधरी यांच्याही नावाची चर्चा 


तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत बिपीन रावत यांचे निधन झाले. रावत यांच्या अपघाती निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. त्याचवेळी रावत यांच्या निधनाने देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले संरक्षण दल प्रमुख पद रिक्त  झाले. दरम्यान, आता  देशातील सैन्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झालीये, ती देशाचे पुढचे सीडीएस कोण?   सीडीएस पदासाठी ज्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा करण्यात आली, त्यात  लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे. आता संरक्षण दल प्रमुख पद रिक्त झाल्याने त्याजागी नवी नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील. सैन्यदलाचा प्रमुख निवडण्यासाठी जी प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया संरक्षण दल प्रमुख पदाच्या नियुक्तीसाठी असेल. सर्वप्रथम सरकार तिन्ही सैन्यदलांतील वरिष्ठ कमांडर्सची एक समिती बनवेल. ही समिती दोन ते तीन दिवसांत शिफारस करेल. तिन्ही सेवांतील अधिकाऱ्यांच्या शिफारशींच्या आधारे दोन-तीन दिवसांत या समितीतील नावांना अंतिम रूप दिले जाईल आणि नंतर ती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. त्याला राजनाथ सिंह यांची मंजुरी मिळाल्यानंतर संभाव्य नावे विचारार्थ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठविली जातील. ही समितीच देशाचा पुढचा संरक्षण दल प्रमुख कोण असेल, यावर अंतिम निर्णय घेईल, असं जाणकार सांगतात. सध्या जनरल एम एम नरवणे हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगण्यात येतंय.  लष्करप्रमुख यांच्‍यासह हवाई दल प्रमुख व्‍ही. आर. चौधरी आणि नौदल प्रमुख आर. हरि. कुमार यांचीही नावांची चर्चा आहे. मात्र, तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार करता नरवणे हे सर्वात ज्येष्ठ आहे. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत, काम हाती घेतलेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणेंनाच आहे. कारण नरवणे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत. शिवाय, नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत. पाच महिन्यांनंतर नरवणे निवृत्त होणार आहेत. त्याचवेळी नरवणे यांनी लष्करप्रमुख म्हणून सक्षमपणे कार्यभार सांभाळला. पूर्व लडाखमधील स्थिती त्यांनी चांगल्याप्रकारे हाताळली. या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. त्यामुळं जनरल एमएम नरवणे हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांचा विचार करता चौधरी यांनी दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे, ३० सप्टेंबर रोजी. तर हरी कुमार यांनी गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबर रोजी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यामुळेच सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता, अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान, सेवा जेष्ठता आणि अनुभव यांचा विचार केला तर, एम. एम. नरवणे हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसतं. मात्र, सरकार आता कुणाच्या खांद्यावर सीडीएस पदाची जबाबदारी टाकतेय, हेच पाहणं महत्वाचं आहे.

हेही वाचा :  ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? तो महत्त्वाचा का असतो? हेलिकॉप्टर अपघाताची तो माहिती कशी सांगतो?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!