Just another WordPress site

Former mayor Shyamla Tade commits suicide | माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची आत्महत्या


अहमदनगर : श्रीगोंदा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे यांनी आज पहाटे गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ताडे यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली. यामागील नेमके कारण  अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अलीकडे राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या ताडे यांनी कौटुंबिक कारणातून हे पाऊल उचललं असावं असा अंदाज आहे. दरम्यान,  या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच यासंबंधी अधिक तपशील उघड होणार असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील धनश्री अपार्टमेंटमधील राहत्या घरी आज पहाटे  तीन वाजण्याच्या सुमारास ताडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात पंख्याला लटकल्याच्या अवस्थेत आढळून आला. याबाबत किरण दगडू ताडे  यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती कळवली. या घटनेची घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  पंचनामा केला. डॉक्टरांनी ताडे यांना मृत घोषित केले. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला. या आयमहत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सध्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहा वर्षांपूर्वी ताडे या श्रीगोंद्याच्या अडीच वर्षे नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्या आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. अलीकडे मात्र त्या किंवा त्यांचे पतीही शहराच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान श्यामला ताडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी घटनेचा  पुढील तपास पोलीस कर्मचारी भारत खारतोडे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!