Just another WordPress site

FIR म्हणजे काय ? FIR दाखल कशी करावी आणि काय आहेत आपले अधिकार?

कोणत्याही गुन्हेगारी घटनेचा कायदेशीररीत्या तपास करण्यासाठी एफआयआर नोंदवणे गरजेचं असतं. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. मात्र,  एफआयआर म्हणजे? FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते?  FIR दाखल करणयासंदर्भात आपल्याला काय अधिकार आहेत? याविषयी जाणून घेऊया.


FIR म्हणजे काय?

जेव्हा पोलिसांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते, त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या प्रथम लेखी दस्तऐवजाला एफआयआर म्हणतात. एफआयआर हा सहसा पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर लिहिलेला अहवाल असतो. कोणतीही व्यक्ती त्याच्यावर किंवा  प्रियजनांसोबत झालेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांत मौखिकरित्या किंवा लेखी तक्रार देऊ शकते. कॉलद्वारे देखील पोलिसांत तक्रार दाखल केली जाऊ शकते.


FIR महत्वाचा का? 

कुठल्याही गुन्ह्यात किंवा घटनेच्या तपासासाठी एफआयआर  हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असतो, कारण त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. एफआयआर लिहिल्यानंतरच पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करतात.


कोण करू शकतो FIR दाखल ?

एखाद्याला एखाद्या संज्ञेय घटनेची माहिती असल्यास, तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवू शकतो. ज्या व्यक्तीबरोबर ही घटना घडली आहे,  त्याच व्यक्तीने एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला एखाद्या संज्ञेय गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास, ते स्वत: देखील एफआयआर दाखल करू शकतात.


FIR दाखल कशी करावी? 

FIR ज्यांच्या न्यायाधिकारक्षेत्रात नोंदवायची आहे त्या पोलीस ठाण्यात जावून तिथे घटना सविस्तपणे सांगावी लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या घटनेची  किंवा गुन्ह्यांची तोंडी माहिती देते, तेव्हा पोलिस ती लिहून घेतात. तक्रारदाराला आपण दिलेला मौखिक माहिती, पोलिसांना लिहून घेतल्यानंतर, पुन्हा वाचून दाखवण्याचा अधिकार आहे. आपण दिलेली माहिती पोलिसांनी लिहून काढल्यानंतर आपण त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. जर आपल्याला पोलिसांनी लिहिलेली माहिती योग्य असेल तरच त्यावर स्वाक्षरी करावी.  एफआयआर नोंदवल्यानंतर त्याची प्रत अवश्य घ्यावी. एफआयआरची प्रत पूर्णपणे विनामूल्य मिळवणे, हा आपला अधिकार आहे.


नोंदविला जात नसेल तर काय करावे?

जर आपला एफआयआर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला जात नसेल, तर आपण वरिष्टांकडे म्हणजे, एसपी, डीआयजी किंवा आयजी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता. आपण आपली तक्रार पोस्टाद्वारे या अधिकाऱ्यांना लेखी पाठवू शकता. ते त्यांच्या पातळीवरून या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देतील. या शिवाय, तुमच्या न्यायक्षेत्रात येत असलेल्या न्यायालयात याबद्दल तक्रार करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!