Just another WordPress site

आमच्या मनातील मुख्यमंत्री हे फडणवीसच; खा. नवनीत राणांच्या पोटातलं ओठावर आलं!

Navneet Rana On Devendra Fadnavis: राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला धरुन वक्तव्य करण्यात आली आहे. आता यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत असं विधान केलं आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपनं आपली उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारसभेत नवनीत राणा(Navneet Rana) बोलत होत्या.

यावेळी राणा म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडलं मग ते गुजरात असो वा गोवा तिथे भाजपला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते.

त्यांची समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत असे कौतुकोद्गार खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल काढले आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते.

आघाडीच्या काळात सरकार बंदीस्त होतं

“सहा महिन्यांपूर्वी आपलं सरकार आलं. मात्र, मागील अडीच वर्षात सरकार बंदीस्त होतं. ते फेसबुक वर ते लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं. जनतेमध्ये सरकार कुठे दिसायचंच नाही. मागील सरकारची वसुलीच दिसायची, मंत्र्यापासून ते अधिकारी जेलमध्ये गेले. वर्क फ्रोम होम आपण पाहिलं होतं, त्या सरकारमध्ये वर्क फ्रोम जेल सुद्धा आपण पाहिलं. मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिम्मत नव्हती की, त्यांचा राजीनामा घ्यावा. शेवटी आपल्याला सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले,” असेही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!