Just another WordPress site

Double Masking: खरंच डबल मास्किंग फायदेशीर आहे? कुणी, कधी, कसं करावं?

कोरोनाचा संसर्ग सध्या वेगानं पसरत असून कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन याला कारण ठरतो. भारतात कोरोना वायरसची दुसरी लाट ही प्रचंड वेगाने आली. महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या म्युटेशनची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर आपण अधिकाधिक तीव्रतेनं संसर्ग करू शकणार्‍या वायरससोबत लढतोय. या नव्या स्ट्रेनमुळं जिथं एका कोरोना पॉसिटिव्ह रूग्णांपासून तीन ते चार लोकांना संसर्ग व्हायचा, तिथं आता एका कोरोना पॉसिटिव्ह रूग्णांपासून आता ८ ते १० जणांना कोरोनाची लागण होत असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनपासून वाचण्यासाठी अनेक जण डबल मास्कचा वापर करतांना दिसताहेत. पण, खरचं दोन मास्क वापरल्यानं आपण कोरोनापासून वाचू शकतो का? डबल मास्क वापरणं कितपत सुरक्षित आहे? दोन मास्क लावल्यानं गुदमरल्यासारखं होत नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं आपण अधिक सजग राहणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं केलेला हलगर्जीपणा आता रूग्णांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र पहायला मिळतयं. दरम्यान, सरकारनं कठोर निर्बंध लावून आपल्याला घरी राहायला भागं पाडलं, हे खरंय. मात्र, अत्यावश्यक कारणांसाठी बऱ्याचदा बाहेर पडावं लागलंच तर  तुम्हांला काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठीच्या नवीन उपायानुसार डबल मास्क वापरणं सुरक्षित ठरू शकतं. अमेरिकेत काही महिन्यांमध्ये डबल मास्कचा ट्रेंड चर्चेत आला होताा. सेंटर ऑफ डिजीज अँड प्रिव्हेंशनच्या मते, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो.


डबल मास्क प्रोटेक्शन म्हणजे काय?कोविड १९ संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणताच ठोस प्रभावी पर्याय उपलब्ध नाहीये. मात्र, डबल मास्कमुळं तुम्हांला धोका कमी करता येऊ शकतो. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता चांगल्या प्रतीचे मास्क वापरायला हवेत. सर्जिकल मास्कचा वापर करणं चांगलं आहे. काही जण दोन-दोन मास्क वापरतात. त्यात आधी सर्जिकल मास्क लाऊन त्यावर कॉटनचा किंवा कापडी मास्क लावलेला असतो.


डबल मास्क अधिक सुरक्षित आहे का?

सीडीसीने केलेल्या अभ्यासानुसार, कोविड -१९ पासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी डबल मास्क अधिक सुरक्षित आहे. या संशोधन अभ्यासात असं आढळले आहे की, हे मास्क कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यास मदत करतात. डबल मास्क हे सिंगल मास्कपेक्षा जास्त संरक्षण प्रदान करतात आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखतो. डबल मास्क हे सूक्ष्मजंतू आणि विषाणूंना संसर्ग पसरविण्यास प्रतिबंधित म्हणजे अडथळा निर्माण करतात. त्यामुळं सिंगल मास्कपेक्षा डबल मास्क वापरणं वापरणं चांगलं आहे.


डबल मास्क वापरणं गरजेचं आहे?

अनेकदा एकच मास्क असेल तर तो चेहर्‍याला नाकाजवळ, तोंडाजवळ नीट बसला नसेल तर कळत नकळत वायरस शरीरात प्रवेश करू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या अभ्यासानुसार, डबल मास्कमुळे वायरसच्या फिल्टरेशन मध्ये प्रभावीपणा वाढू शकतो. त्यामुळं वायरस व्यक्तीच्या नाका-तोंडापर्यंत पोहचण्याची शक्यता मंदावते. त्यामुळं डबल मास्क वापरणं फायदेशीर आहे.


डबल मास्क कोणी वापरायला हवा?

डबल मास्क वापरणं चांगल आहे. मात्र, डबल मास्क वारल्यामुळं अनेकांना अस्वस्थही वाटू शकतं. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे, त्यांनी डबल मास्कचा वापर करायला हवा. आरोग्य कर्मचारी, सॅनिटेशन कर्मचारी यांना डबल मास्क वापरण्याची गरज असते. लहान मुलांना डबल मास्क वापरायला देऊ नका.


कोणत्या ठिकाणी डबल मास्क वापरायचा?डबल मास्क परिधान केल्यामुळे तुमचं संरक्षण मिळू शकतं.  डबल मास्क हा गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच एअरपोर्ट, बस स्टॅन्ड किंवा सार्वजनिक वाहतूक, रुग्णालये आणि कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी डबल मास्कचा वापर करा. सर्जिकल मास्कवर कापडी मास्क किंवा दोन कापडी मास्क अशा पद्धतीने तुम्ही डबल मास्क वापरू शकता. केवळ कॉटनचा मास्क लावल्याने कोरोना विषाणूपासून संरक्षण होऊ शकत नाही. सर्जिकल मास्क लावणंही गरजेचं आहे. सध्या बाहेर पडताना तुम्ही N95 मास्क वापरत असाल तर तो डबल वापरू नका.  


नाक आणि तोंड झाकणं गरजेचं आहे

मास्क योग्यरित्या वापरला गेला तर तो कोरोना विषाणूपासून संरक्षण करेल. मात्र, जर आपण तोंड आणि नाक झाकलं नाही तर विषाणूचा प्रसार होऊ शकतो. म्हणून, डबल मास्कने देखील नाक आणि तोंड व्यवस्थित झाकले पाहिजे.


मास्क वापरताना कोणती काळजी घ्याल?

१. मास्क वापरताना तो चेहर्‍यावर नीट राहतोय याची काळजी घ्या. नाक, तोंड नीट झाकलं जाणं गरजेचं आहे.

२. आपला मास्क इतरांसोबत करू नका. शिवाय, सर्जिकल मास्क पुन्हा धुवून वापरू नका.

३. ओला, दमट मास्क वापरू नका.

४. मास्कचा वापर केल्यानंतर तो रियुजेबल असेल तर कापडी मास्क गरम पाण्यात किंवा निर्जुंतुकीकरण करू शकू अशा पाण्यात स्वच्छ धुवा.

५. बोलताना, शिंकताना मास्क काढणं टाळा. तसेच सारखा मास्कला हात लावणं देखील टाळा.


कोरोना पासून वाचायचं असेल तर मास्कचा योग्य वापर करा. आपलं आणि आपल्या माणसांना कोरोना व्हायरसपासून बचाव करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!